शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

६० हजाराची लाच घेताना हवालदार एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 19:11 IST

एमआयडीसी वाळूज परिसरातील एका कंपनीने तक्रारदार गांजा विक्री करतो, असा अर्ज दिला होता.

ठळक मुद्देदिड लाखाची मागणी तडजोडअंती घेतले ६० हजार रुपये 

औरंगाबाद: पोलीस ठाण्याला प्राप्त अर्जानुसार कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराला १ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड करीत ६० हजार रुपये घेतांना पोलीस हवालदार गणेश ज्ञानेश्वर अंतरप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही १ जुन रोजी सकाळी  कारवाई एम आय डीसी वाळूज ठाण्याच्या प्रवेश दारावर झाली.

या कारवाईविषयी प्राप्त माहिती अशी की, एमआयडीसी वाळूज परिसरातील एका कंपनीने तक्रारदार गांजा विक्री करतो, असा अर्ज दिला होता. मात्र त्यांनी यासबंधी अधिकृत तक्रार नोंदविण्यास नकार दिला होता. दरम्यान हा अर्ज हवालदार अंतरप यांच्याकडे होता. त्यांनी तक्रारदार यांस संपर्क करून त्याला कायदेशीर कारवाई करण्याची धमकी त्यांनी दिली. कायदेशीर कारवाई न करण्यासाठी दिड लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अंतरप विरूध्द तक्रार नोंदविली. 

पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नंदकिशोर क्षीरसागर आणि कर्मचाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा आरोपी हवालदार अंतरप यांनी तडजोड करीत आज सकाळी ६० हजार रुपये पोलीस ठाण्यात आणून देण्यास सांगितले. आज सकाळी १० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी,कर्मचारी यांनी  साध्या वेशात ठाण्याबाहेर सापळा रचला. १० वाजेच्या सुमारास हवालदार अंतरप यानी तक्रारदाराकडुन ६० हजार रुपये लाच घेताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यास रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस ठाण्याच्या गेटवर  झाली. याप्रकरणी एम आय डी सी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबाद