शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या मतदारांची नावे वगळण्याचे षडयंत्र; घोसाळकरांचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: November 22, 2023 15:00 IST

हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगामार्फत नवीन मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. नवीन मतदार याद्या बनविताना कोणाच्या तरी सांगण्यावरून शिवसेनेच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येत असल्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करून घ्यावीत, असे निर्देश संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दिले.

शिवसेना भवन येथे संपर्कप्रमुख घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी शिवसेना पक्ष संघटक चेतन कांबळे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, बंडू ओक, संतोष जेजूरकर, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, युवा सेनेचे ऋषिकेश खैरे, महिला आघाडीच्या सुनीता देव, सुनीता आऊलवार आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. घोसाळकर म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून पैसे खर्च करून खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीमार्फत घराघरातील मतदारांची नावे, मोबाईल नंबर घेतले जात असून ही सर्व नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात आहेत. या एजन्सी सत्ताधारी पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात.

‘पश्चिम’ची जबाबदारी घोडेले यांच्यावरमाजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे घोसाळकर यांनी जाहीर केले. पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे, या मतदारसंघातील बुथनिहाय मतदार याद्यांची तपासणी करून घ्यावी, अशी सूचना त्यांना करण्यात आली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक