शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याविरोधात पक्षातील नेत्याचाच कट; सत्तारांच्या आरोपाने शिंदे गटातील कुरघोडी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:27 IST

टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना टार्गेट, गायरान जमिनीचे प्रकरण यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी घेरले होते.

औरंगाबाद: संपूर्ण हिवाळी अधिवेशन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील विविध आरोपांनी गाजले. आता यावर मंत्री सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली असून माझ्याविरोधात पक्षातील मंत्रिपद न मिळालेला नेता कट करत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही सत्तार यांनी जाहीर केले. यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये अंतर्गत कुरघोडीचा प्रकार समोर आला आहे. 

टीईटी घोटाळा, सिल्लोड महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना टार्गेट, गायरान जमिनीचे प्रकरण यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी घेरले होते. याबाबत अधिवेशनात कृषिमंत्री सत्तार यांनी भावूक होत बाजू मांडली. दरम्यान, सिल्लोड महोत्सव उद्यापासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यात मंत्रीपद मिळत असताना आणि मंत्री झाल्यानंतर वरचेवर होणाऱ्या आरोपांवर सत्तार यांनी खळबळजनक दावा केला आहे. मी मंत्री नसतानाही माझ्यावर आरोप होतात. दरम्यान, आता ज्याला मंत्रिपद मिळाले नाही असा पक्षातील नेता माझ्याविरोधात कट करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कॅबीनमधील चर्चा बाहेर येते. यावरून मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे, असेही सत्तार यांनी म्हटले.  दरम्यान, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सत्तार म्हणतात यात काही तथ्य नसल्याचा खुलासा केला आहे.

१ लाख लीडने निवडून येईल मी लोकांसाठी काम करतो, छोटा कार्यकर्ता आहे. अल्पसंख्याक समाजातील असून कॅबिनेट मंत्री म्हणून चांगले काम करत आहे. मागील वेळी २५ हजार मतांनी निवडून आलो होतो. यावेळी १ लाखांचा मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास मंत्री सत्तार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद