शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्यांनी पर्यटननगरी गजबजली; पर्यटकांची तोबा गर्दी

By संतोष हिरेमठ | Updated: August 14, 2023 15:01 IST

बीबी का मकबरा, देवगिरी किल्ल्यातील चांद मिनार उजळला तिरंगी विद्युत रोषणाईने

छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारची एक सुटी टाकून सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांकडून पर्यटनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात पर्यटकांचा ओघ वाढत असून रविवारी ‘दख्खन का ताज’ म्हणजे बीबी का मकबरा नागरिकांच्या गर्दीने गजबजून गेला. स्वातंत्र्य दिनानिमित्त बीबी का मकबरा, देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यातील चांद मिनार तिरंगी विद्युत रोषणाईने उजळला.

रविवारची सुटी म्हटली की, पर्यटन असे समीकरण पाहायला मिळते. अशातच स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग सुट्यांचा योग जुळवून ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात येत आहेत. त्यामुळे देशभरातील पर्यटक पर्यटननगरीत दाखल होत आहेत. शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्की, औरंगाबाद लेणी येथे रविवारी पर्यटकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरात ढगाच्या गर्दीने वातावरण आल्हाददायक बनले होते. अशा वातावरणात पर्यटनाचा आनंद नागरिकांनी घेतला.

नेहमीपेक्षा अधिक गर्दीएरव्ही सुटीच्या दिवशी बीबी का मकबऱ्याला पर्यटकांची गर्दी असते; परंतु रविवारी इतर दिवसांपेक्षा अधिक गर्दी असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

देशप्रेमाचे वातावरण, सेल्फीवर भरबीबी का मकबरा आणि देवगिरी किल्ल्यातील चांद मिनारवर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली. तिरंगी विद्युत रोषणाईने उजळलेला मकबरा पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली. तिरंगी विद्युत रोषणाईतील मकबऱ्यासोबत पर्यटक सेल्फी घेत होते. तिरंगी विद्युत रोषणाईने मकबरा परिसरात पर्यटकांमध्ये देशप्रेमाचे वातावरण दिसले.

टॅग्स :Bibi-ka-Maqbaraबीबी का मकबराAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन