शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डीएमआयसीसोबत समृद्धी महामार्गाच्या ‘कनेक्टिव्हिटी’चा गुंता सुटता सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:35 IST

Samruddhi Mahamarga ‘एमआयडीसी’चे संचालक मंडळ पेचात  

ठळक मुद्देदर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याही फुकट!

औरंगाबाद : दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याही फुकट, अशा मानसिकतेतून समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा गुंता वाढत चालला आहे. ‘नागपूर-मुंबई’ व्हाया औरंगाबाद या सुपर एक्स्प्रेसवे अर्थात समृद्धी महामार्गाला ‘डीएमआयसी’ची ‘कनेक्टिव्हिटी’ देण्यास राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयारी दर्शविली खरी. मात्र, समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम आणि इंटरचेंजच्या कामाचे पैसे देण्याच्या अटीवरून ‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळासमोर पेच निर्माण झाला आहे. 

झाले असे की, ‘डीएमआयसी’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीमध्ये बहुराष्ट्रीय तसेच देशातील मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी ‘एमआयडीसी’ने समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीबाबत चार महिन्यांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळासमोर प्रस्ताव मांडला होता. तोपर्यंत या महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने नाशिक जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पोहोचले होते. तरीही उद्योगमंत्री सुभाष देसाई व आदित्य ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने सशर्त तयारी दर्शविली. या ‘सुपर एक्स्प्रेस वे’च्या निकषानुसार जोडणाऱ्या रस्त्याचे डिझाईन ‘एमआयडीसी’ला दिले. दिलेल्या डिझाईननुसार रस्त्याचे काम ‘एमआयडीसी’ने करावे. कनेक्टिव्हिटीच्या ठिकाणी इंटरचेंजचे काम ‘मेगा इंजिनिअरिंग ही’ समृद्धी महामार्गाची कंत्राटदार संस्था करेल. या कामासाठी लागणारा अंदाजित २० ते २५ कोटी रुपयांची रक्कम ‘एमआयडीसी’ने द्यावी, या अटी ‘एमएसआरडीसी’ने घातल्या आहेत. नेमक्या या अटी एमआयडीसीला रुचलेल्या दिसत नाहीत. 

‘एमआयडीसी’च्या कार्यालयीन सूत्रांनी सांगितले की, ‘एमएसआरडीसी’ने कनेक्टिव्हिटी देण्यासाठी मान्यता दिली असली, तरी त्यांचा हा खर्चिक प्रस्ताव एमआयडीच्या संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. संचालक मंडळ काय निर्णय घेते, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे तूर्तास तरी भूसंपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आलेली नाही. ही कनेक्टिव्हिटी शेंद्रा व जयपूर औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. 

पावसामुळे रखडले बोगद्याचे काम‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले की, पावसामुळे समृद्धी महामार्ग व बोगद्याच्या कामात थोडा व्यत्यय आला होता. आता पाऊस थांबलाय. आता गतीने काम सुरू होईल. सावंगीजवळ बोगदा तयार केला जात आहे. बोगद्याच्या कामासाठी डोंगर कोरणारी मशीन हैदराबाद येथून मागविण्यात आली आहे. पावसामुळे ती इथपर्यंत पोहोचू शकत नव्हती. दोन मशीनच्या माध्यमातून एकाच वेळी दोन्ही बाजूने बोगद्याचे काम आठवडाभरात सुरू होईल. डिसेंबरअखेरपर्यंत बोगदा तयार होईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबाद