शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

केंद्राच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

By admin | Updated: December 20, 2015 00:10 IST

औरंगाबाद : काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली.

औरंगाबाद : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तत्पूर्वी गांधी भवन पक्ष कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अरुण मुगदिया, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केशवराव औताडे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम, माजी आमदार कल्याण काळे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशाला पारतंत्र्यामधून मुक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. काँग्रेसचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९३८ साली नॅशनल हेरॉल्डची स्थापना केली. त्या काळापासून या वृत्तपत्राने राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळविले होते; परंतु आता काही जणांनी या वृत्तपत्राच्या पाठीमागून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा हा डाव आखला आहे. त्यासाठी कायदेशीर संभ्रम निर्माण केला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यानंतर गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात वरील पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास औताडे, माजी महापौर सुदाम सोनवणे, मनपाचे गटनेते भाऊसाहेब जगताप, जिल्हा परिषदेचे सभापती विनोद तांबे, माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे, शिक्षक सेलचे अध्यक्ष मनोज पाटील, अ‍ॅड. एकबालसिंग गिल, एनएसयूआयचे अध्यक्ष सागर साळुंके, युवक काँग्रेस लोकसभेचे अध्यक्ष प्रभाकर मुठ्ठे पाटील, सेवादलाचे शहर अध्यक्ष आतिश पितळे, प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष हमद चाऊस, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष खालेद पठाण, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे, शोभा खोसरे, पूर्व विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत पठाण, जगन्नाथ काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल सोनवणे, नगरसेवक शेख सोहेल, शेख नवीद, डॉ. पवन डोंगरे, माजी नगरसेवक शकील पटेल, अजीज खोकर, जमील अहेमद खान, राजेश मुंडे, अनिल मानकापे, बाळासाहेब भोसले, सय्यद अफजल हुसेन, बाबा तायडे, मोईन हर्सूलकर, सय्यद आसिफ, शेख कैसर आदी सहभागी होते.