शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

महाविकास आघाडीचा काँग्रेस पाठिंबा काढणार; रामदास आठवलेंचे भाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 1:37 PM

Congress to withdraw support Mahavikas Aghadi यूपीआयच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळेल

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार

औरंगाबाद : यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे, अशी मागणी खा. संजय राऊत करीत आहेत. त्यांच्या या मागणीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद द्यायला काँग्रेस तयार आहे, असे वाटत नाही. या मुद्यावर काँग्रेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता असल्याचे मत रिपाइं (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. हे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत त्यांनी केले.मी पुन्हा येईन, असे फडणवीस कुणाच्या जोरावर म्हणतात तर अजित पवारांच्या जोरावर. ते दोघे एक दिवसासाठी एकत्रित आले होते. आता यूपीआयच्या अध्यक्षपदावरून वाद उफाळेल आणि हे दोघे एकत्रित येऊन पुन्हा सरकार स्थापन करू शकतात, असे आठवले म्हणाले.

गेल्या वर्षभरापासून शिवसेना एनडीएतून बाहेर पडलेली आहे. ती यूपीएमध्येपण नाही. तरी शिवसेनेचे संजय राऊत हे शरद पवार यांना यूपीएचे नेतृत्व दिले जावे, अशी मागणी करीत आहेत. शरद पवार यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदर आहे; पण इतिहास पाहिल्यास काँग्रेसने सतत अन्याय केला आहे. त्यांना कधी काँग्रेसचे अध्यक्ष होऊ दिले नाही. मनमोहनसिंग यांच्याऐवजी शरद पवार यांना पंतप्रधान करायला पाहिजे होते; पण तसे घडले नाही. आता काँग्रेस त्यांना यूपीएचे अध्यक्षपद देईल, असे वाटत नाही. या मुद्यावरून काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आठवले यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना आठवले म्हणाले की, आजपर्यंत कायदेच रद्द करा असे कुणी सांगितले नाही. हे संविधान विरोधी होय. कायद्यात दुरुस्तीची मागणी होऊ शकते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आम्हीही नामांतरासारखा लढा लढलेलो आहोत; परंतु समन्वय साधून या प्रश्नावर तोडगा काढला. काही शेतकरी नेते आंदोलन भडकवीत आहेत. येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

रिपब्लिकन ऐक्याची शक्यता नाही, असे सांगत, गेल्या १९९८ पासून माझ्याशी प्रकाश आंबेडकर बोलत नाहीत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला बाबूराव कदम, दौलत खरात, मिलिंद शेळके, कांतीकुमार जैन, पप्पू कागदे, किशोर थोरात, नागराज गायकवाड, अरविंद अवसरमोल, संजय ठोकळ, प्रशांत शेगावकर, संजय बनसोडे आदींची उपस्थिती होती.

आता नो कोरोनाचा नारा..कोरोना सुरू झाला तेव्हा मी ‘गो कोरोना...कोरोना गो’ असा नारा दिला होता. आता माझा नारा ‘नो कोरोना...कोरोना’ असा आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद