शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला न्यायच मिळत नाही; अमित देशमुख यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 12:13 IST

एखाद्याची हवा असेलही, पण ती फार काळ टिकणार नाही, हे लक्षात ठेवा.

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या मित्रपक्षांमध्ये मोठी स्पर्धा आहेच, पण यात काँग्रेसला न्याय मिळत नाही. ठरलेल्या सूत्रांनुसार वाटा मिळत नाही, असा हल्लाबोल सोमवारी येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी चढवला. जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित डिजिटल सदस्य नोंदणीकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते चिकलठाणा एमआयडीसीतील सागर रिसोर्टमध्ये बोलत होते. कार्यकर्त्यांना न्याय देण्यात विलंब होतोय याची कबुली देत, पण याचा विसर पडलेला नाही, याची जाणीवही यावेळी त्यांनी करून दिली.

भाजपमध्ये वगैरे जाण्याचा अजिबात हेतू नाही. काँग्रेसलाच गतवैभव प्राप्त करून देऊ, असा शब्द यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी दूध संघाच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिला. सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारणापेक्षा ‘सहकार’ महत्त्वाचा असतो. त्यामुळे माझ्यापर्यंतही तक्रारी आल्या, पण या निवडणुकीत कल्याण काळे यांनी जे काही केले ते चुकीचं केलं, असं वाटत नाही, अशा शब्दांत अमित देशमुख यांनी काळे यांना क्लीन चिट देताच काळे यांच्या जिंदाबादच्या घोषणा निनादल्या. यावेळी दूध संघाच्या नवनिर्वाचित काँग्रेसच्या संचालकांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. काळे हरफन मौला आहेत. काँग्रेसच्या दृष्टीने जिल्हा कमकुवत आहे, पण त्याला काळेच उभारी देऊ शकतील. याबद्दल शंकाकुशंका असतील असं वाटत नाही, असे सांगत व पाठीमागे वळून बघत देशमुख यांनी, यासाठी लाल सोफ्यावर बसलेल्यांमध्येसुद्धा समन्वय हवा, असा टोमणा मारताच सभागृहात हंशा पिकला.

औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेस संपल्यागत आहे. तिला ताकद द्या, अशी विनंती यावेळी बोलताना ग्रामीणचे निरीक्षक आमदार शिरीष चौधरी यांनी देशमुख यांना केली. जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलासबापू औताडे, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा हेमा पाटील, नामदेव पवार, ॲड. सय्यद अक्रम, डॉ. जितेंद्र देहाडे, खालेद पठाण, रमेश पा. डोणगावकर, किरण पा. डोणगावकर आदींची मंचावर उपस्थिती होती. राहुल सावंत यांनी सूत्रसंचालन केले.

एखाद्याची हवा असेलही, पण ती फार काळ टिकणार नाहीमहाविकास आघाडीचं सरकार येऊन दोन वर्षे झाली, पण औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, असं मला जाणवत नाही असे स्पष्टपणे नमूद करीत देशमुख म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या संघटनेचे नाव काँग्रेस आहे. आज काँग्रेसचा इतिहास पुसून टाकण्यात येत आहे. एखाद्याची हवा असेलही, पण ती फार काळ टिकणार नाही, हे लक्षात ठेवा. सर्वधर्मसमभावाचा विचार बाजूला पडत आहे. एक विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्याच्या निवडणुका व्हाॅट्सॲप व फेसबुकवरच होतील. सध्या तरी हे माध्यम मोफत आहे. फिडबॅक घेण्याचं हे माध्यम आहे. नव्याने राजकारणात आलेल्यांना यांचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी दिला.

टॅग्स :Amit Deshmukhअमित देशमुखcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी