शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून बाबूराव कुलकर्णी यांना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:15 IST

सुभाष झांबड यांना पुन्हा संधी नाही  

ठळक मुद्देविनोद पाटील यांनीही घेतली मैदानातून माघार शिवसेना-भाजप युतीकडून अंबादास दानवे हे उमेदवार असतील

औरंगाबाद : विधान परिषदेच्याऔरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडल्याची माहिती मात्र समोर आली नाही. या मतदारसंघाचे विद्यमान आ. सुभाष झांबड यांचा काँग्रेसने यावेळी पत्ता कट केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे, तर विनोद पाटील यांनी या मतदारसंघातून माघार घेतली आहे. दरम्यान आ. झांबड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

शिवसेना-भाजप युतीकडून अंबादास दानवे हे उमेदवार असतील हे मागेच स्पष्ट झाले आहे. अधिकृत घोषणा पक्षाने केली नसली तरी तेच उमेदवार असतील. सेनेकडून उमेदवार जाहीर झाल्यामुळे काँग्रेसकडून कोण? यावरून चर्चा सुरू होत्या. विद्यमान आ. झांबड हेच उमेदवार असतील असे वाटत होते; परंतु कुलकर्णी यांनी यावेळी उमेदवारी पदरात पाडून घेतली. सध्या दानवे विरुद्ध कुलकर्णी अशी लढत होणार असल्याचे दिसत असले तरी येणाऱ्या दोन दिवसांत चौथा उमेदवार निवडणूक रिंगणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चार उमेदवारांमध्ये लढत झाली तर पसंती क्रमाच्या मतांमुळे युतीकडे बहुमत असतानाही विजयाचे गणित बदलून अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

येथून मागे असेच निकाल लागलेले आहेत. चौथा उमेदवार तयार करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. हा उमेदवार कोण असेल, हे १ तारखेपर्यंत स्पष्ट होईल. विनोद पाटील यांनी निवडणूक मैदानातून माघार घेतली आहे. सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी तलवार म्यान केली आहे. त्यामुळे चौथा उमेदवार कोण याकडे आता डोळे लागले आहेत. 

शिवस्वराज्य बहुजन पक्षाचा अर्ज कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्या शिवस्वराज्य बहुजन पक्षातर्फे विशाल नांदरकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेत शिवसेनेला जाधव यांनी जेरीस आणले होते. दरम्यान आ. जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल केल्याबाबत मला माहिती नाही; परंतु अर्ज दाखल केला असेल तर चांगलीच बाब आहे. 

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदAurangabadऔरंगाबादJalanaजालना