शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पालोदकर सिल्लोडमध्ये सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 11:57 IST

सत्तारांच्या बंडामुळे काँग्रेसच्या रिक्त झालेल्या जागेवर कब्जा मिळविण्याचा पालोदकरांचा प्रयत्न

सिल्लोड (औरंगाबाद ) : माजी जि.प. अध्यक्ष प्रभाकर पालोदकर सिल्लोड -सोयगाव विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. औरंगाबादेत चिकलठाणा विमानतळावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची मंगळवारी त्यांनी भेट घेतली. या भेटीमुळे तालुक्यात  वातावरण तापले असून नव्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.  

या मतदारसंघाचे विद्यमान आ. अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने तालुक्यात राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. स्थानिक भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सिल्लोडमध्ये बैठक घेऊन सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध दर्शविला होता. सत्तारांच्या बंडामुळे आता काँग्रेसच्या रिक्त झालेल्या जागेवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न पालोदकर यांनी सुरू केल्याचे दिसते आहे.  

सिल्लोडमध्ये काँग्रेसला आता पालोदकर हेच तारू शकतात, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी पक्षश्रेष्ठीला सांगितले. त्यानंतर पालोदकर व  चव्हाण यांची औरंगाबादेत भेट होऊन चर्चाही झाली. या चर्चेतील मुद्दे अद्याप समोर आलेले नाहीत; परंतु या घडामोडीनंतर सिल्लोडमधून पालोदकर हे काँग्रेसतर्फे आगामी विधानसभा निवडणूक लढणार, या विषयावर सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे. पालोदकरांमुळे राजकारणाला कलाटणी मिळेल.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदvidhan sabhaविधानसभाAurangabadऔरंगाबाद