शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
6
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
7
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
8
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
9
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
10
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
11
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
12
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
13
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
14
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
15
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
16
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
17
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
18
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
19
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
20
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या मुलीसाठी मतदार यादीत घोळ: दानवे; त्यांना बेछूट आरोपांची सवय: शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:37 IST

या प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार केल्याचेही दानवे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीसाठी मतदारयादीत घोळ केल्याचा आरोप करीत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाला टीकेचे लक्ष्य केले. या प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार केल्याचेही दानवे यांनी सांगितले.

जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी काही राजकीय नेत्यांच्या मुला-मुलींसाठी मतदारयाद्यांमध्ये घोळ घालण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी मतदारयाद्या अंतिम करण्यात आल्या असताना शिरसाट यांच्या मुलीचे नाव यादीत टाकण्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी अर्ज करण्यात आला. बीएलओने राजकीय दबावाखाली हे नाव समाविष्ट केल्याचे दानवे म्हणाले.

पवारांचा सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारावर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात वाद झाला. यावेळी अजित पवार यांनी ‘पार्थवर गुन्हा दाखल झाला तर आपण सरकारमधून बाहेर पडू’, असा इशारा दिल्याची माझी माहिती आहे. कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना वाचवत आहेत, असा आरोपही दानवे यांनी केला. उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून वागणूक न देता त्यांना संशयित गुन्हेगार म्हणूनच वागवले पाहिजे.

दानवेंना बेछूट आरोपांची सवय : शिरसाटदानवे यांनी केलेल्या आरोपाची पालकमंत्री शिरसाट यांनी खिल्ली उडविली. ते म्हणाले, त्यांना बेछूट आरोप करण्याची सवय लागली आहे. नवमतदार नोंदणी आणि मतदार स्थलांतर या निरंतर चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. माझ्या मुलीचे नाव दोन ठिकाणी यादीत नसावे, यासाठी नाव स्थलांतर केले आहे. यासाठी आयोगाकडून रीतसर प्रक्रिया समजून घेतली, आयाेगाने याबाबत मला पत्र देखील दिले. ही प्रक्रिया दानवेंना समजत नसेल तर अवघड आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister's Daughter's Voter List Error: Danve Alleges; Shirsaat Denies

Web Summary : Danve accuses Shirsaat of voter list irregularities for his daughter, prompting denial. Danve also alleged Pawar threatened government exit over son's case. Shirsaat dismisses accusations.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेSanjay Shirsatसंजय शिरसाटElectionनिवडणूक 2024