उघड्या घरातून कपाटात ठेवलेले ३० हजार रुपयांसह २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरल्याच्या गुन्ह्यात सिडको पोलिसांनी प्रथमेशला अटक केली होती . दीड- दोन महिन्यांपूर्वी गजानननगर येथील एका घरातून एक लाख ६० हजार रुपये किमतीची ३२ ग्रॅम वजनाची सोन्याची दोन बिस्किटे चोरल्याची कबुली त्याने दिली होती . ती बिस्किटे पोलिसांनी जप्त केली होती. या गुन्ह्यात प्रथमेशने ॲड. कार्तिक शर्मा यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणी अंती न्यायालयाने प्रथमेशला १५ हजाराच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
चोरीच्या गुन्ह्यात सशर्त जामीन
By | Updated: November 26, 2020 04:12 IST