शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

चार आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 20:20 IST

नांदेड :आत्माअंतर्गत कार्यरत बीटीएम, एटीएम आणि सीपी यांचे थकित मानधन त्वरित अदा करावे यासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १५ मार्चपासून आंदोलन सुरू केले आहे

नांदेड :आत्माअंतर्गत कार्यरत बीटीएम, एटीएम आणि सीपी यांचे थकित मानधन त्वरित अदा करावे यासह विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १५ मार्चपासून आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ आत्माअंतर्गत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व संगणक आज्ञावली रूपरेषक या पदावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुधारित मानधन द्यावे, असे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद आहे़ त्यानुसार आत्माचे संचालक यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना २०१४-१५ या आर्थिक वर्षापासून सुधारित मानधन देण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र, प्रकल्प संचालक कार्यालयाने एप्रिल २०१४ पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन अदा केलेले नाही़ याविरोधात कर्मचाऱ्यांनी प्रकल्प संचालक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़ वाढीव मानधन त्वरित अदा करावे, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे दरवर्षी मानधनामध्ये १० टक्के वाढ करण्यात यावी आणि मागील सहा महिन्यांपासूनचे थकित मानधन त्वरित अदा करावे, अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत़ प्रकल्प संचालक कार्यालयासमोर के़ वी़ घाटे, एस़ के़ पटवे, एस़ पी़ आचमारे, एल़ एस़ जालावार, एस़ ए़ घुमलवाड, डी़ एल़ सोनटक्के, नितीन दुरूगकर, एस़ पी़ कांबळे, ए़ ए़ पवार, ए़ एम़ बोईनवाड आदी उपोषणास बसले आहेत़ दरम्यान, गुरूवारी उपोषणकर्ते नितीन दुरूगकर आणि एस़ पी़ कांबळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ (प्रतिनिधी)प्रकल्प संचालक आत्मा यांच्या कार्यालयासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गत चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे़ त्यांच्या आंदोलनाची दखल घेणे, वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविणे आदी बाबी करण्याऐवजी अधिकारी-कर्मचारी रजेवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले़ शुक्रवारी दुपारी कार्यालयात केवळ शिपाई उपस्थित होते़ त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे़ गुरूवारी दोघांची आणि शुक्रवारी चौघांची अशा एकूण सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचाराकरिता शासकीय रूग्णालयात दाखल केले़ यातील दोघांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले़ तर उर्वरित चौघांवर उपचार सुरू आहेत़ यामध्ये के़ बी़ घाटे, एस़ के़ पटवे, सोहेल आणि गुंडावार यांचा समावेश आहे़ उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे़