शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

कर्ज घेऊन विकास ही संकल्पनाच अमान्य-आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:32 IST

शहरातील विकास प्रकल्पांचा वाटा भरण्यासाठी आणि काही विकासकामे करण्यासाठी महापालिकेने १५० कोटींचे कर्ज घेतले असले तरी हे संपूर्ण कर्ज न घेता आवश्यक तेवढीच रक्कम घेतली जाईल, कर्ज काढून विकास ही संकल्पनाच आपल्याला मान्य नसल्याचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मंजूर कर्जातील जवळपास ३० ते ४० कोटी रुपये उचलणार नसल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरातील विकास प्रकल्पांचा वाटा भरण्यासाठी आणि काही विकासकामे करण्यासाठी महापालिकेने १५० कोटींचे कर्ज घेतले असले तरी हे संपूर्ण कर्ज न घेता आवश्यक तेवढीच रक्कम घेतली जाईल, कर्ज काढून विकास ही संकल्पनाच आपल्याला मान्य नसल्याचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मंजूर कर्जातील जवळपास ३० ते ४० कोटी रुपये उचलणार नसल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी बहुतांश पदाधिकारी, नगरसेवकांनी अर्धवट विकासकामांचा उल्लेख केला. ही कामे पूर्ण होणे आवश्यक होते, असेही ते म्हणाले. या सर्व बाबींवर बोलताना आयुक्तांनी आपली भूमिकाही स्पष्टपणे सहभागृहात ठेवली. कचºयाच्या प्रश्नावर प्रशासन अपयशी ठरल्याचे त्यांनी कबूल केले. त्याचवेळी आर्थिक विषयावर मात्र आयुक्तांनी विरोधकांसह सत्ताधाºयांच्या डोळ्यातही अंजन घातले. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता नवीन कामे करणे शक्यच नाही. त्यामुळेच मागील तीन महिन्यांपासून एकाही नवीन कामाच्या संचिकेला आपण मान्यता दिली नसल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.त्याचवेळी पदाधिकाºयांसह नगरसेवकांनीही महापालिकेची आर्थिक बाजू समजून घेताना त्यासाठी कोणताही दबाव आणला नाही. यात सर्वांचेच सहकार्य राहिले आहे. महापालिकेला ४७ कोटींचे दायित्व असताना आणखी कर्ज घेऊन विकासकामे करणे म्हणजे येणाºया सभागृहाच्या डोक्यावर कर्ज ठेवणे चुकीचे ठरणार आहे.विशेष म्हणजे, सभागृहाने जेएनएनयुआरएम, बीएसयुपी, नगरोत्थान योजना पूर्ण करण्यासाठी जो वाटा महापालिकेला भरावयाचा आहे त्यासाठी १५० कोटींचे कर्ज घेण्यास संमती दिली आहे. राज्य सरकारनेही या कर्जाची हमी घेतली आहे. मात्र १५० कोटींचे हे मंजूर कर्ज आवश्यकतेप्रमाणेच उचलले जाईल.जुने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकेचा आवश्यक तो वाटा या कर्जातून भरला जाईल. मात्र कर्ज काढून कोणतीही नवी कामे घेतली जाणार नाहीत, असेही ते म्हणाले. आगामी काळात महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मालमत्ता कराची वसुलीही यापुढे वेळेत केली जाईल असेही देशमुख म्हणाले़