शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

दर्शनासाठी व्हावे लागणार संगणक साक्षर

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

मोहन बारहाते , मानवत आधुुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना संगणक साक्षर व्हावे लागणार आहे

मोहन बारहाते , मानवतआधुुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना संगणक साक्षर व्हावे लागणार आहे आणि ही काळाची गरज झाली आहे. यामुळे भक्तांचा वेळ, श्रम आणि पैसाही वाचणार आहे. त्यामुळे आधुनिक युगात भाविकांना निरक्षर राहता येणार नाही. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरची यात्रा भरते. भागवत धर्मात आषाढी एकादशीला विशेष असे स्थान आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातूूनही पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीनीच्या दर्शनाला आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक येतात. आळंदी ते पंढरपूर लाखो वारकऱ्यांची दिंड्याही पंढरपुरात दाखल होतात. परंतु या दिंड्यातील वारकऱ्यांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागते. त्यामुळे पंढरपूरच्या संस्थानने एक वेबसाईट काढून विठ्ठल दर्शनाची पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी ६६६.५्र३३ँं’१४‘ँे्रल्ल्रंि१२ँंल्ल.ूङ्मे. यावर जाऊन दर्शनाच्या पंधरा दिवसांपूर्वी आॅनलाईन फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी भाविकाचा एक फोटो आणि मोबाईल नंबर द्यावा लागतो. सदरील आॅनलाईन फॉर्म भरल्यानंतर एक दर्शन पास मिळतो. या पासवरून त्या भाविकास विठ्ठल रुक्मीनीचे अर्ध्या तासात दर्शन होते. या सुविधेमुळे भाविकांना पंढरपुरात रूम करून राहण्याची व वेळ खर्च करण्याची गरज पडत नाही. परंतु आॅनलाईन पासची संख्या मर्यादित असल्याने पासही लवकर संपतात. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असणाऱ्यांना तत्काळ व वेळेच्या आत पास मिळवावा लागतो. पंढरपूराकडे जाणारा वारकरी हा सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि दीनदुबळा असतो. त्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड बसू शकत नाही. त्यामुळे सर्वसामान्य वारकऱ्याला त्याचा लाभ मिळेल की नाही? हे सांगता येत नाही. परंतु आधुनिक काळातील ज्ञानतंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यालाही विठ्ठलाचे दर्शन लवकरात लवकर घेता येणार आहे. परंतु त्यासाठी त्याला संगणक साक्षरताही अंगीकारावी लागेल. (वार्ताहर)