शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

वैजापूरात कचऱ्यातून कंपोस्ट खतनिर्मितीवर भर; स्वच्छता सर्वेक्षणात मराठवाड्यात पटकावला दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 17:47 IST

सर्वेक्षणात शहराने महाराष्ट्रात बारावा, तर मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 

ठळक मुद्दे350 टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून १०० टन खत तयार केले.32कंपोस्ट खड्डे नगर परिषदेने येवला रस्त्यावर तयार केले आहेत. 

- मोबीन खान 

वैजापूर (जि. औरंगाबाद) : कचऱ्याच्या प्रश्नामुळे स्मार्ट सिटी औरंगाबाद गेल्या वर्षभरापासून चर्चेत असतानाच जिल्ह्यातील वैजापूरने कचरामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कचऱ्याच्या वर्गीकरणापासून ते कंपोस्ट खत निर्मितीपर्यंत नगरपालिकेने भर दिला आहे. वैजापूरकरांना लागलेल्या स्वच्छतेच्या वेडामुळे स्वच्छता सर्वेक्षणात शहराने महाराष्ट्रात बारावा, तर मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 

४५ हजार लोकसंख्येच्या या वैजापूर शहरात ११ घंटागाड्या आणि ७७ कामगार कचरा उचलण्याचे काम करतात. लोकसंख्येच्या तुलनेत कामगारांचे प्रमाण कमीच पण, तरीही शहरातून ३.६ मेट्रिक टन कचरा संकलित होतो. यासाठी जीपीएस यंत्रणा लावण्यात आली. ज्यामुळे कचरा संकलनाला मदतच झाली. नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मुख्याधिकारी विठ्ठल डाके, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी केली. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यात घट झाली. घरातील कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले. याचा परिपाक म्हणून ६ महिन्यांत ५५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात नगर परिषद यशस्वी ठरली. 

खतविक्री शहरातील एकूण कचऱ्यापैकी 2.4 टन ओला कचरा कंपोस्ट खतनिर्मितीसाठी वापरला जातो. यासाठी येवला रोडवर 32 खड्डे तयार केलेले आहेत. तसेच पाला-पाचोळ्याचेही कंपोस्ट खत केले जात आहे. याचबरोबर विंड्रो कंपोस्टिंगचाही प्रयोग केला जात आहे. इथे तयार होणाऱ्या खताची विक्री पालिकेने आता सुरू केली आहे. सुक्या कचऱ्यातही काच, प्लास्टिक, लोखंडाच्या वस्तू गोळा करून नेण्याचे काम कचरा वेचक महिलांकडून होते. प्लास्टिक  पिशव्या वेगळ्या करून त्या कंपनीस पाच रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत. 

प्रशासकीय, राजकीय इच्छाशक्तीजिल्ह्याबाहेर फारसे परिचित नसलेले वैजापूर २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षणात देशात २३ व्या स्थानी, तर राज्यात १२ व्या आणि मराठवाड्यातून दुसऱ्या क्रमांकावर आले. शहराच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीने नागरिकांच्या मदतीने वैजापूरला हे यश मिळवून दिले. 

शहरातील कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताचे मार्केटिंग व प्रत्यक्ष विक्री करण्यासाठी ‘हरित कंपोस्ट खत’ हा ब्रँड वापरण्यास राज्य शासनाने वैजापूर नगर परिषदेस परवानगी दिली आहे. राज्यातील मोजक्या नगरपालिकांना ही परवानगी मिळाली असून त्यात येथील पालिकेचा समावेश आहे. डंपिंगग्राऊं ड हद्दपार करीत मोजक्या मनुष्यबळाच्या जोरावर नगर परिषदेने ‘तीन स्टार’ मिळवत स्वच्छतेत शहराचा ठसा उमटविला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabadऔरंगाबाद