शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

कुलगुरू चोपडे यांची चौकशी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कारभारावर विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतले होते.

ठळक मुद्देआरोप : समितीने राज्य सरकारला सादर केला अहवाल

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कारभारावर विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतले होते. यावर राज्यपालांच्या परवानगीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. चोपडे यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी २३ मार्च रोजी शासन निर्णयाद्वारे माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या तीन सदस्यीय समितीने चौकशी अहवाल २० आॅगस्ट रोजी राज्य सरकारला सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत आ. सतीश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या विद्यापीठातील अभ्यास मंडळांच्या नेमणुकीच्या घोटाळ्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सर्व तक्रारींच्या चौकशीसाठी माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. या समितीमध्ये जळगाव येथील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. बी. पाटील आणि नांदेड येथील विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कथलाकुट्टे यांचा सदस्य म्हणून समावेश होता.

शासन निर्णय निघाल्यानंतर दोन महिन्यांनी पूर्ण समितीचे गठण करण्यात आले होते. या समितीला चौकशीची पत्रे मिळाल्यानंतर अध्यक्षांसह सदस्यांनी अनेक वेळा विद्यापीठात येऊन कागदपत्रांची तपासणी केली. यातच पावसाळी अधिवेशनात हा विषय पुन्हा येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे समितीने वेगाने काम केले.विद्यापीठ प्रशासनाने अनेक वेळा समितीला सहकार्य न केल्यामुळे चौकशीला उशीर झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.२० आॅगस्ट रोजी समितीने चौकशी अहवाल बंद पाकिटामध्ये राज्य सरकारला सादर केला आहे.

यांनी केल्या होत्या तक्रारीविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कारभाराविरोधात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह विद्यापीठातील मागासवर्गीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष बोरीकर, मराठवाडा कृती समितीचे प्रा. दिगंबर गंगावणे, अ‍ॅड. शिरीष कांबळे, अ‍ॅड. मनोज सरीन, मनसेचे गौतम आमराव, श्रीरंग वारे, बुद्धप्रिय कबीर आदींनी राज्यपाल कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. या सर्व तक्रारींची शहानिशा समितीने केली आहे.

सत्य अहवाल दिलासमितीने प्रत्येक तक्रारीची शहानिशा केली. त्यात आढळलेल्या त्रुटींचा अहवालात समावेश केला आहे.यात सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे अभ्यास मंडळावरील नेमणुकांमध्ये अधिक गडबड झालेली असल्याचे समजते. काही खरेदींच्या प्रकरणातही ताशेरे ओढल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र