शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडातील कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून साडेएकोणीस लाखांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 19:27 IST

याप्रकरणी सायबर ठाण्यात आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देबंद फोनने बिंग फुटले शिक्षकाला कागदपत्रांसाठी मागितले पैसे

औरंगाबाद : कॅनडातील कंपनीत अभियंता पदाच्या जागेसाठी आॅनलाईन सर्चिंग करणाऱ्या एका शिक्षकाला ठकबाजाने बनावट करारपत्र पाठवून १९ लाख ६२ हजार ६५५ रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर ठाण्यात आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ओमकार सुनील सांगवीकर (२७, रा. नाथपुरम, ईटखेडा) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ओमकारचे शिक्षण पदव्युतर भूगर्भशास्त्र विषयात झाले असून, एका शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे; परंतु परदेशात जाण्याची संधी आॅनलाईन जाहिरात आल्याने त्याने पेजवर लाईक केले आणि बायोडाटा पाठविला. कॅनेडियन कंपनीत अभियंता पदावर निवड झाल्याचा संदेश आल्यामुळे ओमकार खुश झाला. सतत मोबाईल तसेच सोशल मीडियावर संपर्कात राहिल्याने त्यालाही नोकरी मिळाल्याचा आभास निर्माण झाला. आॅनलाईन ठकबजाने त्यास व्हिसा, इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आॅनलाईन बँकेतून मोठ्या रकमा वसूल केल्या. बनावट करारपत्र पाठविले

तुमची नियुक्ती झाली असून, त्या प्रकारचे बनावट करारपत्र पाठवून आॅनलाईन दिले. जुलै २०१८ पासून सुरू असलेल्या घटनेत साडेएकोणीस लाख लुबाडले होते; परंतु विदेशात जाण्याचा योग मात्र येताना दिसत नाही. कागदपत्रांची चाचपणी केली असता अशी कोणतीही कंपनी आढळून आली नाही. ही बाब जेव्हा तपासली तेव्हा ओमकार सांगवीकर यांच्या पायाखालील वाळू सरकली. 

फोन बंदने फुटले बिंगओमकार यांनी सोशल मीडिया तसेच फोनवर सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु काही संदेश नाही आणि फोनचे उत्तर नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे समजले. एका डॉक्टरलादेखील असेच आॅनलाईन गंडा घालण्यात आल्याची बातमी ताजी असतानाच नोकरीच्या आमिषाने ही दुसरी मोठी फसवणुकीची तक्रार सायबर ठाण्यात दाखल झाली आहे. याविषयी सायबर ठाण्याच्या वतीने तपास सुरू आहे. 

आभासी जगात अडकू नकानोकरीच्या आमिषाने महत्त्वाच्या कागदपत्रांची अनोळखी लोकांना फोनवर माहिती देऊ नका किंवा आॅनलाईन कागदपत्रे पाठवू नका. हॅकर व आॅनलाईन ठकबाजांच्या जाळ्यात अडकू नका, असे असल्यास त्यावर तात्काळ पोलीस ठाणे किंवा जाणकाराचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ठकबाजावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या रकमा फॉरवर्ड करू नये, असे आवाहन सायबर शाखेचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस