किनवट : अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था किनवटच्या वतीने किनवट येथील भीमयान बुद्धविहार परिसर समतानगर येथे १८ मे रोजी आयोजिलेल्या ९ व्या सामुहिक बौद्ध मंगल परिणय मेळाव्यात ५१ जोडपी विवाहबद्ध झाली़ अध्यक्षस्थानी अॅड़ सुभाष ताजणे होते़ उद्घाट आ़ प्रदीप नाईक यांच्या हस्ते झाले़ माजी आ़ भीमराव केराम, युवा नेते कपिल नाईक, उपनगराध्यक्ष साजीद खान, न्यायमूर्ती गौतम भरणे, अॅड़ केक़े़ साबळे, जि़प़ सदस्य बंडूसिंग नाईक, अशोक सूर्यवंशी पाटील, माजी नगराध्यक्ष के़मूर्ती, डॉ़बी़डी़ चव्हाण, प्रा़किशनराव किनवटकर, पं़स़ सदस्य बालाजी मुरकुटे, यादवराव भवरे, नगरसेवक अभय महाजन, गजानन बोलचेट्टीवार, जि़प़ सदस्य दिनकर दहिफळे, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, शेख सलीम, विनायक गव्हाणे, चंद्रभीम हौजेकर आदी उपस्थित होते़ ५१ जोडप्यांचा परिणय विधी धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत भदंत नागघोष यांनी लावला़ तत्पूर्वी स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले़ आ़ प्रदीप नाईक व माजी आ़ भीमराव केराम यांनी नवजोडप्यांना शुभेच्छा दिल्या़ प्रास्ताविक मंगल परिणय मेळाव्याचे आयोजक माजी नगराध्यक्ष अरूण आळणे यांनी केले़ सूत्रसंचालन देवकांत वंजारे, डॉ़संतोष वाठोरे यांनी केले़ निमंत्रक महेंद्र सुखेदव मुनेश्वर, दयानंद पाटील, महेंद्र वासाटे, अनिल भगत, सुरेश मुनेश्वर, प्रल्हाद भरणे, संतोष दिपके, अनिकेत कांबळे, अमर शिंदे, प्रवीण गायकवाड, दत्ता कसबे, विजय पोलासवार, मनोहर मुनेश्वर, राहुल कापसे, सुगत नगराळे, मयूर महाबळे आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)
सामुहिक मंगल परिणय सोहळा
By admin | Updated: May 19, 2014 00:19 IST