शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुका येताच आला मोसम मतदारांच्या स्थलांतराचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 14:25 IST

काही वॉर्ड आरक्षित होण्याचा विचार करून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देवॉर्ड आरक्षणाच्या माहितीवरून इच्छुकांचा फंडा

औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुका येताच मतदार स्थलांतरित करण्याचा मोसम सुरू झाला आहे. एखादे नैसर्गिक संकट आल्याप्रमाणे मतदार एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात स्थलांतरित करण्यासाठी फॉर्म नं. ८ चे गठ्ठेच्या गठ्ठे बीएलओंना (बुथ लेव्हल आॅफिसर) हाताशी धरून पुरवणी यादीत घुसविण्याचे प्रकार काही वॉर्डांमध्ये होतील, असा संशय व्यक्त होत आहे. तर काही वॉर्ड आरक्षित होण्याचा विचार करून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सोशल मीडियामध्ये उतरत्या क्रमानुसार ११५ पैकी अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित होणाऱ्या वॉर्डांची यादी सध्या फिरते आहे. त्या यादीला कोणताही आधार नसला तरी मनपा हद्दीतील आरक्षित वॉर्डांमध्ये दुसऱ्या वॉर्डांतील ओळखीचे मतदार स्थलांतरित करायचे. जेणेकरून निवडणुकीत त्या मतदारांचे १०० टक्के मतदान पदरात पाडून घ्यायचे आणि विजयी व्हायचे. असे गणित करून मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या आहेत. शिवसेनेनेदेखील याबाबत तक्रार केली होती.

२०१५ सालच्या निवडणुकीत काय घडले होते२०१५ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत  पश्चिम आणि पूर्व मतदारसंघातील आरक्षित असलेल्या वॉर्डांमध्ये ८०० हून अधिक मतदार स्थलांतरित करण्यात आले होते. त्या मतदारांचे पूर्ण मतदान स्थलांतर करून घेणाऱ्या उमेदवाराच्या पारड्यात गेले होते. यामुळे अनेक पक्षांचे उमेदवार पराभूत झाले होते. या निवडणुकीतही तसाच प्रकार होण्याची चर्चा सुरू आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांचे मत असे....निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी सांगितले, बीएलओंची बैठक येत्या आठवड्यात घेण्यात येईल. मतदार स्थलांतराचे अर्ज स्क्रूटणी करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पाच पन्नास मतदारांचे स्थलांतर होत असेल तर ठीक आहे; परंतु शेकड्यांनी स्थलांतर होत असेल तर याबाबत पारदर्शकता आणावी लागेल. नवमतदार नोंदणी ही नियमित प्रक्रिया आहे. निवडणुकीपुरता मतदार नोंदणी कार्यक्रम नसतो. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक