शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा ! गुंठेवारीतील पाडापाडीला तूर्त स्थगिती; पालकमंत्री सुभाष देसाईंची मनपाला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 15:01 IST

Subhash Desai : दिवाळीत पाडापाडी नको, अशा सूचना सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई  ( Subhash Desai) यांनी प्रशासकांना दिल्या.

ठळक मुद्देबांधकामे अधिकृत करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर देण्यात आली आहे.गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नियमित करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले

औरंगाबाद : गुंठेवारी कायद्याअंतर्गंत ३१ डिसेंबर २०२०पूर्वी बांधलेली अनधिकृत घरे अधिकृत करून देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात दोन लाखांहून अधिक घरे अनधिकृत आहेत. महापालिकेकडे ( Aurangabad Municipal Corporation) अत्यंत कमी प्रस्ताव आल्याने १ नोव्हेंबरपासून पाडापाडी सुरू करण्याचा इशारा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मागील आठवड्यात दिला होता. दिवाळीत पाडापाडी नको, अशा सूचना सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई  ( Subhash Desai) यांनी प्रशासकांना दिल्या. त्यामुळे औरंगाबादकरांना किंचित दिलासा मिळाला आहे.

बांधकामे अधिकृत करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर देण्यात आली आहे. १ नोव्हेंबर रोजी महापालिकेतून जेसीबी, बुलडोझर बाहेर निघेल. शहरातील किमान एक तरी मालमत्ता जमीनदोस्त करून यंत्रणा परत येईल, असे प्रशासक पाण्डेय यांनी जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक बांधकामांवर हातोडा टाकण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. या निर्णयामुळे गुंठेवारी भागातील व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई हे शहरात आले असता आमदार, माजी नगरसेवकांनी त्यांना हा प्रकार सांगितला. तेव्हा याची दखल घेत पालकमंत्री देसाई यांनी गुंठेवारीधारकांना दिलासा देण्यासंदर्भातील निर्देश प्रशासकांना दिले.

त्रिमूर्ती चौकात कारवाईची तयारी...पहिल्या टप्प्यात महापालिकेने शहरातील त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी चौक या रस्त्यावर गुंठेवारी क्षेत्रातील व्यावसायिक बांधकामे तोडण्याची तयारी केली होती. तूर्त ही तोडफोड होणार नसली तरी गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून नियमित करून घ्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे, अशी माहिती आ. अंबादास दानवे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका