शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'...आता आमच्यासोबत या'; विनोद पाटील यांना शिवसेनेची ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:42 IST

पाटील यांनी त्यांना ताबडतोबीने काहीही प्रतिसाद दिला नाही.

ठळक मुद्देयुवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे गेले घरी  किती दिवस बाहेर राहता, आमच्यासोबत या

औरंगाबाद : राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले आणि मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा उभारणारे विनोद पाटील यांना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेनेत येण्याची ‘ऑफर’ दिली.

जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे शहरात होते. सकाळी त्यांनी पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे आणि पाटील यांच्यात चर्चेचा सेतू बांधला. ठाकरे आणि पाटील यांच्यामध्ये १० ते १५ मिनिटे चर्चा झाली. सुरुवातीला सर्वांनी मिळून चहा घेतला. नंतर शिंदे आणि इतर नेत्यांना ठाकरे यांनी बाहेर धाडले ठाकरे आणि पाटील यांच्यातच चर्चा झाली. या चर्चेत  ठाकरे यांनी पाटील यांना किती दिवस बाहेर राहता, आता आमच्यासोबत या, अशी साद घातली. पाटील यांनी त्यांना ताबडतोबीने काहीही प्रतिसाद दिला नाही. 

पालकमंत्री शिंदे यांनी पाटील यांना औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेशासाठी साकडे घातले होते. परंतु पाटील यांनी नकार दिला होता. मराठा कार्ड म्हणून शिवसेना विनोद पाटील यांच्या दारी जात आहे. परंतु पाटील यांनी अजून तरी होकार दिलेला नाही. आदित्य ठाकरे यांनी त्यांना प्रवेशाबाबत विचारणा केल्यामुळे  राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

पाटील, ठाकरे चर्चेत काय तरुणांसाठी काम करायचे असेल, तर असे बाहेर राहून किती दिवस चालेल, आमच्यासोबत या, एकत्रित काम करू, असे आवाहन ठाकरे यांनी केले. शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील युवकांसाठी ठाकरे काम करीत आहेत. मोफत शिक्षण, आरोग्य, केंद्रीय विद्यापीठ हे मुद्दे घेऊन ठाकरे कार्य करीत आहेत. युवकांसाठी भविष्यात सोबत येऊन काम करता येईल यावर पाटील आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाली. या भेटीबाबत पाटील यांनी खूप बोलणे टाळले. तसेच शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. सदिच्छा भेटीप्रमाणे आमच्यात चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

काय दिली ऑफर सेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद पाटील यांना शिवसेनेचे उपनेतेपद किंवा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी किंवा आगामी काळात विधान परिषदेवर निवडून देण्याबाबत शिवसेना तयार आहे.  पाटील यांनी याबाबत अद्याप कोणताही होकार दिला नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना