शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक रंगरंगोटीने औरंगाबाद रेल्वेस्टेशनचे रुपडे पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:38 IST

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डिसेंबरमध्ये औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे रुपडे पालटले आहे. रेल्वे अधिकाºयांच्या दौºयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रेल्वेस्टेशनवर विविध कामांची लगीनघाई सुरू आहे.

ठळक मुद्दे महाव्यवस्थापकांचा दौरा : कारवाई टाळण्यासाठी विविध कामांची लगीनघाई

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डिसेंबरमध्ये औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने मॉडेल रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे रुपडे पालटले आहे. रेल्वे अधिकाºयांच्या दौºयाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रेल्वेस्टेशनवर विविध कामांची लगीनघाई सुरू आहे.‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पाहणी दौरा आहे. या पार्श्वभूमीवर विविध कामांचा धडाका सध्या रेल्वेस्टेशनवर सुरू आहे. यात प्रामुख्याने रेल्वेस्टेशनच्या मुख्य इमारतीच्या रंगकामाला प्राधान्य देण्यात आले. गेली अनेक वर्षे ही इमारत केवळ पांढºया रंगाची होती. परंतु आता जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना नजरेसमोर ठेवून पांढºया रंगाच्या भव्य इमारतीला आकर्षक असे रंगकाम करणे सुरू आहे. यात इमारतीवरील नक्षीकामाचा भाग चॉकलेटी रंगाने रंगविण्यात आला. त्यामुळे रेल्वेस्टेशनच्या इमारतीचे सौंदर्य अधिक खुलले आहे. औरंगाबादेत दाखल होणारे अनेक पर्यटक इमारतीसमोर छायाचित्र घेत असल्याचे पाहायला मिळते.कारंजे होणार सुरूरेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीसमोरील कारंजे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. परंतु हे कारंजेही पुन्हा सुरू केले जाणार आहे. नव्या इमारतीच्या अंतर्गत भागात रंगकाम आणि दुरवस्था झालेल्या भागांची दुरुस्ती केली जात आहे. रेल्वे अधिकाºयांच्या दौºयाच्या निमित्तानेच कामे करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.जुनी इमारत ‘जैसे थे’मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसºया टप्प्यात जुन्या इमारतीचा विकास केला जाणार आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून दुसºया टप्प्यातील काम काही केल्या सुरू झालेले नाही. त्यामुळे जुन्या इमारतीची अवस्था वाईट झालेली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद