शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

महाविद्यालयीन शिक्षक-कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे देता येतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:33 IST

महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना निवडणुकीची कामे देता येतील, असा निर्वाळा देत न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.एम. ढवळे यांनी बुधवारी याचिका निकाली काढल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी, १८ जुलै २०१८ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना निवडणुकीची कामे देता येतील, असे आयोगातर्फे निदर्शनास आणून दिल्याने महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना निवडणुकीची कामे देता येतील, असा निर्वाळा देत न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.एम. ढवळे यांनी बुधवारी याचिका निकाली काढल्या.मनपा आयुक्तांच्या वरील आदेशाच्या नाराजीने प्रताप महाविद्यालयातील डॉ. अमित बाबूराव पाटील व इतर ५७ कर्मचारी तसेच धामणगाव महाविद्यालयातील के.एम. पाटील व इतर २५ कर्मचा-यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाने याचिका क्रमांक १५१४/२०१७ व इतर याचिकांच्या अनुषंगाने २ मार्च १९९५ रोजीच्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाविद्यालयीन शिक्षक आणि कर्मचा-यांना निवडणुकीची कामे देण्याचा अधिकार नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्या आदेशाचा आधार घेत याचिकाकर्त्यांनी निवडणुकीची कामे सोपविणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा भंग असून, कामे सोपविण्याचा अधिकार आयोगाला नसल्याचे याचिकेत स्पष्ट केले आहे.मात्र, सुनावणीवेळी राज्य निवडणूक आयोगाचे वकील शिवाजीराव टी. शेळके यांनी राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेली अधिसूचना खंडपीठात सादर केली.सुनावणीअंती खंडपीठाने याचिका निकाली काढल्या. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद भंडारी आणि अ‍ॅड. मुकुल कुलकर्णी यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठElectionनिवडणूक