शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मित्राने शिवीगाळ केल्याने महाविद्यालयीन तरूणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 18:17 IST

पोलिसांनी आरोपीला अटक करून तिच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी सुरु केली आहे.

औरंगाबाद: वाढदिवसाच्या कार्यक्रमात मित्राने शिवीगाळ केल्याने अपमानित झालेल्या तरूणीने घरी येऊन आत्महत्या केल्याची घटना मुकुंदवाडीतील अंबिकानगर येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या मित्राला अटक केली. घराशेजारी राहणाऱ्या मुलीसह वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मित्रांची पोलिसांनी चौकशी सुरू केली.

स्वप्नील डिब्बे (वय २४,रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे अटकेतील तरूणाचे नाव आहे. तर पूजा मच्छिंद्र गायकवाड (वय १८, रा. अंबिकानगर)असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यू.जी. जाधव म्हणाले की, मृत पूजा हिने नुकतीची बारावी बोर्ड परिक्षा दिली होती. सीईटी आणि नीट परिक्षेची ती तयारी करीत होती. सिडको एन-१ ते कॅनॉट रस्त्यावरील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये ती नीट आणि सीईटची तयारी करण्यासाठी जात. रविवारी सायंकाळी कॅनॉट येथे तिच्या क्लासमधील शुभम वाघ या मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त सर्व मित्र-मित्रांनी शुभमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कॅनाट मार्केट येथे जमले होते. या वाढदिवसाकरीता पूजाही गेली होती. 

दरम्यान, पूजाचा मित्र आरोपी स्वप्नील डिब्बे हा सुद्धा तिथे आला होता. स्वप्नील हा तिच्यापेक्षा सात ते आठ वर्षांनी मोठा असून तो अ‍ॅक्सीस बँकेत नोकरी करतो. तेथे त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर पूजा सरळ घरी आली त्यावेळी तिची आई आणि बहिण कामानिमित्त बाहेर होती. घरी कोणीही नसताना तिने लगेच तेथून आईला फोन लावून कोठे आहे असे विचारले.  तेव्हा थोड्यावेळाने घरी येते असे आईने तिला सांगितले. नंतर तीने तिचा मित्र स्वप्नीलला फोन करून ती आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तेव्हाही त्याने तिला असे करू नको, असे सांगत शिवीगाळ केली. नंतर तिने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने तिची आई घरी आल्यानंतर त्यांना ही घटना दिसली. याप्रकरणी पूजाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्नीलला अटक केली असून तिच्या वर्गमित्र आणि मैत्रिणींची चौकशी सुरू केली.