शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय पडले ओस; सर्वसामान्य नागरिक वेठीस

By विकास राऊत | Updated: July 19, 2024 12:16 IST

कार्यालयात शेकडो संचिका तुंबल्या; संपावर तोडगा नाही, पुढच्या आठवड्यात चर्चा

छत्रपती संभाजीनगर : महसूल कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा न निघाल्यामुळे चार दिवसांपासून सामान्यांचे हाल होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा हतबल असून, संपामुळे अभ्यागतांची गर्दी कमी झाल्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय ओस पडले होते.

मंगळवारपर्यंत संप? गुरुवारी संपावर तोडगा निघतो का, याकडे संघटनेचे लक्ष होते, परंतु महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दोन दिवसांनी चर्चा करू, असे संघटनेच्या अध्यक्षांना नाशिक येथे सांगितले. त्यामुळे मंगळवारपर्यंत संप सुरूच राहणार, अशी परिस्थती सध्या तरी आहे. १८ वर्षांपासून आकृतीबंध मंजूर होत नाही. महसूल यंत्रणेवर विविध योजनांच्या कामांचा भार आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. संपावर अद्याप तोडगा निघाला नाही, त्यामुळे संप सुरूच ठेवण्यात संघटना कायम आहे. या संपाला इतर संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यात ४३७ कर्मचारी सुमारे ९०० कर्मचाऱ्यांचे कामकाज सांभाळत आहेत, तर विभागातील सुमारे ५ हजार कर्मचाऱ्यांचे काम ३ हजार कर्मचारी करीत आहेत. परिणामी, अतिरिक्त कामाच्या ताणामुळे कर्मचारी तणावात आहेत.

१८ वर्षांपासून तोच आकृतीबंध२००६ पासून आकृतीबंध मंजूर करून त्यानुसार कर्मचारी भरती नाही. कमी कर्मचाऱ्यांवर काम करावे लागते आहे. एकेका कर्मचाऱ्यावर तीन-तीन टेबलचा भार आहे. असे असताना शासन चार दिवसांपासून चर्चेला देखील बोलावत नाही, हे खेदजनक आहे. गुरुवारी महसूल मंत्र्यांसोबत संघटना अध्यक्ष बोलले, परंतु त्यांनी दोन दिवसानंतर मागण्यांबाबत बोलणार असल्याचे नमूद केले.-परेश खोसरे, महसूल कर्मचारी संघटना, जिल्हाध्यक्ष

संचिका टेबलवरचसंपकरी अव्वल कारकुनांच्या टेबलवरच संचिका असतील. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारीदेखील कार्यालयात नाहीत. प्रशासकीय सुनावण्यांची कामे लांबली आहेत. लाडकी बहीण योजनेचे काम देखील ठप्प पडले आहे. संपावर कधी तोडगा निघतो याकडे लक्ष आहे.-विनोद खिराेळकर, निवासी उपजिल्हाधिकारी

संप कधीपासून : १५ जुलैपासूनकिती मागण्या : १४ प्रकारच्या विविध मागण्याकोण संपावर : वर्ग क व ड श्रेणीतील कर्मचारीकिती संचिका तुंबल्या : ५००छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय : ४३७ कर्मचारी संपावरकोणत्या विभागावर परिणाम : जमिनीसह पुरवठा व इतर विभाग, सामान्य प्रशासन, गृहशाखा, पुरवठा विभाग, पुनर्वसन विभाग

मराठवाड्यातील संपाबाबत आकडेवारीमराठवाडा : ३ हजार कर्मचारी सहभागविभागीय आयुक्तालय : ४७,जालना :२४९-परभणी : ४६४हिंगोली : १५९नांदेड : ७२७बीड : ४०८लातूर : ३४२धाराशिव : २१०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRevenue Departmentमहसूल विभाग