शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयातील २५० वैद्यकीय शिक्षकांचे सामुहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2022 16:00 IST

प्रशासनाकडून डाॅक्टरांना मिळणाऱ्या वागणूकीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

औरंगाबाद : महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे (एमएसएमटीए) शिष्टमंडळ मुंबईत वैद्यकीय शिक्षण सचिवांना भेटीसाठी गेल्यावर त्यांना अपमानास्पद वागणूक देवून असंसदीय भाषेत अपमानित केल्याच्या निषेधार्थ शनिवारी घाटीतील अडिचशे डाॅक्टरांनी सामुहीक रजा घेत असल्याची पुर्वसुचना प्रशासनाला दिली.

एमएसएमटीए ची शुक्रवारी बैठक पार पडली. यात वैद्यकीय शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा, सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित मागण्या प्राधान्याने सोडवा. तसेच अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमीत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रशासनाकडून डाॅक्टरांना मिळणाऱ्या वागणूकीचा निषेध व्यक्त करण्यात आला.  संतप्त भावना वैद्यकीय शिक्षकांनी व्यक्त केल्या. ओपीडी, आयपीडीत कोणतीही सेवा दिली जाणार नसल्याचे स्पष्ठ केले.

त्यानंतर सर्व वरीष्ठ डाॅक्टरांनी प्रभारी अधिष्ठाता डाॅ. वर्षा रोटे यांना सामुहीक रजेच्या आंदोलनाची पुर्वसुचना व मागण्यांचे निवेदन संघटनेकडून अध्यक्ष डाॅ. भारत सोणवणे यांनी दिले. शासकीय कर्करोग रुग्णालयातील डाॅक्टरही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. तर डाॅ. रोटे यांनी वैद्यकीय शिक्षकांच्या भावना डिएमईआरला कळवू. तर वैद्यकीय अधिक्षक डाॅ. काशिनाथ चौधरी म्हणाले, उद्या डाॅक्टरांचे आंदोलन असल्याने निवासी डाॅक्टरांच्या मदतीने रुग्णसेवा देवू. तसेच नियोजित शस्त्रक्रीया होणार नाही. केवळ आपत्कालीन शस्त्रक्रीया होतील.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर