शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हव्यातशा सेल्फिचा मोह नडला; तरुण अजिंठा लेणीतील सप्तकुंडात कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 18:23 IST

स्थानिक लेणीपूर, सावरखेडा, पिंपळदरी येथील ग्रामस्थ, सुरक्षा रक्षक आणि पुरात्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवला जीव

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा ( Ajantha Cave ) लेणीतील धबधब्याजवळ सेल्फी घेण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना आज दुपारी घडली. दैवबलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थ, सुरक्षा रक्षक आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. 

हिमांशू रॉय असे सेल्फी घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. जळगाव येथून काही तरुण आज जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या दर्शनासाठी सकाळीच आले होते. लेणी पाहिल्यानंतर काही मित्रांसोबत हिमांशू लेणीजवळील धबधब्याच्या समोरील व्यू-पॉइंटवर गेला. येथे धबधब्यासोबत हवातसा सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात हिमांशू व्यू-पॉइंटवरून खाली उतरून डोंगराच्या टोकावर आला. येथून सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन हिमांशू खाली सप्तकुंडात कोसळला.

हिमांशू कोसळताच त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. आवाज ऐकून स्थानिक लेणीपूर, सावरखेडा, पिंपळदरी येथील ग्रामस्थ, सुरक्षा रक्षक आणि पुरात्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी लागलीच दोरी आणि गळ खाली टाकून हिमांशूला अथक प्रयत्नाने बाहेर काढले. किरकोळ इजा झालेली आहे. दैवबलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबाद