शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता संपली आता आरोग्याचे प्रश्न मार्गी लागण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 19:02 IST

घाटीतील सुपर स्पेशालिटी विभाग, महिला रुग्णालय, मिनी घाटीकडे लक्ष

ठळक मुद्देअनेक योजनांना प्रशासकीय मान्यता मिळण्याची नुसती वाट पाहावी लागत आहे. महिला रुग्णालयाची उभारणी कधी?

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी विभाग आणि चिकलठाण्यातील मिनी घाटी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासह आरोग्याशी संबंधित रेंगाळत राहिलेले अनेक प्रश्न आचारसंहिता संपल्याने मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. 

जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या घाटीतील सुपर स्पेशालिटी विभागाचे काम ९० टक्क्यांवर अडकले आहे. या विभागाच्या विजेच्या जोडणीसाठी २.४० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. मनुष्यबळाचाही प्रश्न रेंगाळलेला आहे. याबरोबर माता व बाळाला एकाच छताखाली उपचार मिळावे, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी निधीही मिळाला. परंतु घाटी की, दूध डेअरीच्या जागेत, या विभागाला मुहूर्त मिळाला नाही. हा विभाग घाटीत उभारण्याचे जवळपास निश्चित आहे. मात्र, त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याची नुसती वाट पाहावी लागत आहे. 

चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय जूनपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक डॉ. अनुपकुमार यादव यांनी मार्चमध्ये औरंगाबाद दौऱ्यात सांगितले होते. मात्र, दोन महिने उलटूनही याठिकाणी अनेक यंत्रसामुग्रींची प्रतीक्षाच आहे. आचारसंहिता असल्याने यंत्रसामुग्री मिळण्यास अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. यंत्रसामुग्रींशिवाय हे रुग्णालय २४ तास आणि संपूर्ण २०० खाटांसह सुरू होणे अशक्य आहे. परंतु आता आचारसंहिता संपलेली असल्याने हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास गती मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, सुपर स्पेशालिटी विभागाच्या विजेसाठी २.४० कोटींचा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर होईल, अशी आशा आहे. या विभागाच्या मनुष्यबळाचाही प्रस्ताव सादर केलेला आहे. एमसीएच विंगसाठी पाठपुरावा केला जात असून, त्यास लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे. यंत्रसामुग्री प्राप्त होऊन लवकरात लवकर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होईल, यासाठी प्रयत्न केला जात आहे. महिला रुग्णालयाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया होऊन लवकरच भूमिपूजन होईल, असे ते म्हणाले.

महिला रुग्णालयाची उभारणी कधी?शहरातील दूध डेअरी येथील जागेत प्रस्तावित शासकीय महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधीची तरतूदच झालेली नाही. त्यामुळे या रुग्णालयाची उभारणी रखडणार आहे. ४निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला असून, पहिल्या टप्प्यातील निधी मिळताच या रुग्णालयाचे काम सुरू होईल, याची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी