शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कोळपे-पाटील मल्टीस्टेटचे साहित्य जप्त

By admin | Updated: November 25, 2015 23:20 IST

वलांडी : येथील मार्केट यार्डात असलेल्या कोळपे-पाटील क्रेडिट को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेटमधील साहित्याच्या जप्तीची कारवाई बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली

वलांडी : येथील मार्केट यार्डात असलेल्या कोळपे-पाटील क्रेडिट को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेटमधील साहित्याच्या जप्तीची कारवाई बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. देवणी तालुक्यातील वलांडी येथे कोळपे-पाटील क्रेडिट को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेटची शाखा आहे. या शाखेअंतर्गत गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने बुधवारी रात्री उशिरा मल्टी स्टेटमधील साहित्याच्या जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात एकूण २२ शाखा असून, १६ शाखांमधील गुंतवणूकदारांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्यापैकी पाच शाखांतील साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून वलांडी येथील ही शाखा कुलूपबंदच होती. परिणामी, गुंतवणूकदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदविली. बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने वलांडीतील या शाखेतील एक संगणक, नोटा मोजण्याची मशीन, तिजोरी, टेलिफोन, रजिस्टर, कॅशबुक, व्हाऊचर, हजेरीपत्रक, चार टेबल आदी ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वलांडीतील ही शाखा डिसेंबर २०१४ पासून बंद असल्याचे गुंतवणूकदारांनी सांगितले. या प्रकरणी महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्याअन्वये कलम ४०६, ४२०, ४०९, ३४ भादंविप्रमाणे संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.