शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

अनधिकृत प्राथमिक शाळा बंद करा, जिल्हा परिषद शिक्षण सभापतींचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 7:31 PM

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या खाजगी अनधिकृत प्राथमिक शाळा बंद करा. प्रत्येक शाळांच्या दर्शनी भागात अनधिकृत शाळा नसल्याचे बोर्ड लावा, असे आदेश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण सभापती मीना शेळके यांनी दिले. 

 औरंगाबाद : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या खाजगी अनधिकृत प्राथमिक शाळा बंद करा. प्रत्येक शाळांच्या दर्शनी भागात अनधिकृत शाळा नसल्याचे बोर्ड लावा, असे आदेश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण सभापती मीना शेळके यांनी दिले. 

सभापती मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी जि. प. शिक्षण समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हाभरात सर्वत्र अनधिकृत शाळा राजरोसपणे सुरू आहेत, याकडे सदस्यांन लक्ष वेधले.  तेव्हा औरंगाबाद तालुक्यात अशी एकही अनधिकृत शाळा नाही, असे गटशिक्षणाधिकारी राकेश साळुंके यांनी स्पष्ट केले. तेव्हा सभापती शेळके यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांची तपासणी करून त्या अनधिकृत शाळा तात्काळ बंद कराव्यात, असे आदेश दिले. या बैठकीत जि. प. शाळांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात ४० टक्क्यांपेक्षा कमी गुणवत्ता असलेल्या ४२ शाळा असून, यामध्ये कन्नड तालुक्यात २२, सिल्लोड १०, सोयगाव ६ व गंगापूर तालुक्यात ४ शाळा आहेत. या शाळांच्या गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील कुठलीही शाळा ५० टक्क्यांपेक्षा खाली राहणार नाही, असा शब्द यावेळी शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी दिला. ‘सीबीएसई’च्या नावाखाली अनेक शाळांकडून पालकांची फसवणूक केली जात आहे. अशा शाळांची ५ जूपर्यंत तपासणी करण्यात यावी, अशी सूचना केली.

पूर्वमान्यतेशिवाय वर्ग सुरू करू नकाबैठकीत जि. प. शाळांना वर्ग जोडण्याचा विषय चर्चेला आला. तेव्हा शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी स्पष्ट केले की, जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शाळांना इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग जोडले जातात. परंतु पूर्वमान्यतेशिवाय हे वर्ग सुरू करूनयेत, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत.असे वर्ग जोडण्यासाठी शिक्षण समितीची परवानगी घेऊन मगच सदरील प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे सादर करावेत लागतात. दरम्यान, ९ वीच्या वर्गासाठी प्राप्त झालेल्या ४३ प्रस्तावांची निकषाप्रमाणे तपासणी करून अहवाल सादर करावा, असे जैस्वाल म्हणाले.  

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा