शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

पीएचडीच्या मौखिक परीक्षेच्या जेवणावळी बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:14 IST

कुलगुरूंच्या आदेशानंतर पीएच.डी. विभागाने काढले परिपत्रक

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागात होणाऱ्या पीएच.डी. मौखिक चाचणीनंतर संशोधक विद्यार्थ्यांना जेवणावळी द्याव्या लागतात. या जेवणावळी तात्काळ बंद करण्यात याव्यात, असे परिपत्रक पीएच.डी. विभागाने काढले आहे.  

मराठवाडा असोसिएशन फॉर स्टुडंटस् (मास) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेत पीएच.डी.च्या मौखिक परीक्षेनंतर होणाऱ्या जेवणावळीकडे लक्ष वेधले. संशोधकांचा व्हायवा मोठा सोहळा असतो. मौखिक चाचणीचे परीक्षक, मार्गदर्शक आणि विभागप्रमुख यांच्या भोजनाची जबाबदारी संशोधकाला उचलावी लागते. यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतात. परीक्षक विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये न राहता महागड्या हॉटेलात राहतात. यामुळे संशोधक विद्यार्थ्याला ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च सोसावा लागतो. मौखिक चाचणी ही परीक्षाच असल्यामुळे तेथे हे प्रकार कसे घडतात, असा सवाल करीत मास संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास उढाण यांनी कुलगुरूंसमोर तक्रारीचा पाढाच वाचला.

विद्यापीठाच्या कामकाजातील त्रुटी दूर करा, पीएच.डी. विभागात तात्काळ अतिरिक्त कर्मचारी नेमा, वसतिगृह आणि अभ्यासिकेत सुरळीत पाणीपुरवठा करा, गाईडशिपची यादी अपडेट करणारी यंत्रणा विकसित करा, संशोधन विभागातील काम किती दिवसांत होईल, याची माहिती देणारे बोर्ड लावा, अशी मागणीही करण्यात आली. सध्या पीएच.डी. विभागात एकही काम तात्काळ होत नाही. व्हायवा झाल्यानंतर तात्काळ नोटिफिकेशन मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना शिष्टमंडळाने केली. त्यावर सकाळच्या सत्रात व्हायवा आणि सायंकाळपर्यंत नोटिफिकेशन देण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सांगितले. शिष्टमंडळात सचिन बोराडे, अमित कुटे, प्रमोद गायकवाड, दादासाहेब कांबळे, दिगंबर जाधव, अजय पवार, आदित्य मुठ्ठे, विजय चिंचाणे यांचा समावेश होता. सूचनांची दखल घेत कुलगुरूंनी तात्काळ पीएच.डी. विभागात पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली, तसेच जेवणावळी, हार, पुष्पगुच्छ देणे-घेणे येऊ बंद करावे, असे परिपत्रक काढले.

कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे?विद्यापीठ यंत्रणेने कामकाज सुरळीत केल्यास विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही; पण काम सुरळीत होत नाही. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कुणाचे आहे, असा प्रश्न डॉ. उढाण यांनी केला. कोणतेही काम निर्धारित वेळेत आणि पाठपुरावा केल्याशिवाय होत नाही, असे त्यांनी डॉ. चोपडे यांच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Studentविद्यार्थीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद