शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त कागजीपुऱ्यात ४ थी ते ८ वीचे वर्ग सुरु; मित्रांच्यासोबतीने बालकांचे उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 19:07 IST

as corona's second wave decreased Schools Starts again : औरंगाबाद जिल्ह्यात ६३३ शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत.

ठळक मुद्दे शाळा सुरू होणाऱ्या गावांतील विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागले होते. 

खुलताबाद ( औरंगाबाद ) : कोरोनामुक्त कागजीपुरा येथील जिल्हा परिषदेची इयत्ता ४ थी ते ८ वीचे वर्ग आज गुरूवारपासुन सुरू करण्यात आले आहेत. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतस्तरावर संरप़च व शालेय समितीने कोरोना नियमांचे पालनकरून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. शाळेमध्ये मित्रांच्यासंगतीने विद्यार्थ्यांनी उत्साहात आगमन केल्याचे चित्र होते. 

कोरोनामुक्त असलेल्या गावांत, सरपंचाच्या अध्यक्षतेखालील समितीचा ठराव घेऊन पालकांच्या लेखी संमतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रत्यक्ष वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यानुसार जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोनामुक्त ४४६ गावांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे या शैक्षणिक सत्रात गुरुवारी पहिल्यांदा शाळांची घंटा वाजली. ग्रामीण भागात ५९५ गावांत ८५२ शाळा आहेत. १६ जूननंतर एकही कोरोनाचा रुग्ण न आढळलेली ४४६ गावे आहेत. शाळा सुरू होणाऱ्या गावांतील विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागले होते. 

कागजीपुरा येथे सरपंचाच्या अध्यक्षतेखालील बैठकीत गाव शंभर टक्के कोरोनामुक्त गाव असल्यामुळे ४थी ते ८ वी पर्यंत वर्गसुरु करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. या बैठकीस सरपंच नाजरीन साजीद कुरैशी, उपसरपंच शेख अहेमद, तलाठी आर. डी. कराळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहमंद अलताफ हुसेन,वैद्यकीय अधिकारी डाॅ. बी. आर. पांडवे, ग्रामसेवक व्ही. एम. आदमवाड,केंद्रप्रमुख के ई गायकवाड , मुख्याध्यापक आस्मा बीबी मोहमंद हाफीज उपस्थित होते. यानंतर आजपासून येथील शाळा सुरु करण्यात आली. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात ६३३ शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. आज ४५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. नियमानुसार अर्धे विद्यार्थी एकदिवसाआड बोलविण्यात येत आहेत. यावेळी कोरोनाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. 

गाव कोरोनामुक्त करणे आणि ठेवण्याचे असेल आव्हानजिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णवाढ कमी असली तरी अद्यापही दोन अंकी वाढ सुरूच आहे,तर दोनशेहून अधिक गावे सध्याही बाधित आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील, तर शाळा सुरू झाल्यावर गावात रुग्ण आढळला, तर शाळा बंद करण्यात येईल. त्यामुळे गावकऱ्यांवरही गाव कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान आता असणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादSchoolशाळा