शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

गायरान जमिनीवरून दोन गटात हाणामारी

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

परंडा : गायरान जमिनीवरून गत सहा महिन्यांपासून सोनगिरी ग्रामस्थ व पारधी समाजात सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान गुरूवारी सकाळी तुंबळ हाणामारीत झाले़

परंडा : गायरान जमिनीवरून गत सहा महिन्यांपासून सोनगिरी ग्रामस्थ व पारधी समाजात सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान गुरूवारी सकाळी तुंबळ हाणामारीत झाले़ हाणामारीदरम्यान कोयता, कुऱ्हाड, काठी, चटणीचा वापर झाल्याने सात जण गंभीर जखमी झाले़ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून १९ जणांविरूध्द परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़परंडा पोलिस ठाण्यात एवरेड्या पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सोनगरी गायरान जमिनीवर गुरूवारी सकाळी सुभाष नामदेव वेताळ, सुखदेव वेताळ, लक्ष्मण वेताळ, तानाजी वेताळ, रावसाहेब गणपती वेताळ, मोहन वेताळ, राजेंद्र वेताळ, विष्णू वेताळ, कृष्णा वेताळ, लक्ष्मण कुंडलिक वेताळ, महादेव खरपुडे व इतर तेहतीस जणांनी ‘तुमच्या बापाची गायरान जमीन आहे का?’ असे म्हणत चितरंग्या पवार, अत्याबाई पवार, उषा पवार, गुडी पवार, रुपाली पवार, सुषमा काळे यांना काठी, कुऱ्हाड, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले़ तर एवरेड्या पवार यांच्या दुचाकीवर दगड घालून नुकसान केले. पवार यांच्या फिर्यादीवरून सुभाष नामदेव वेताळ, सुखदेव वेताळ, लक्ष्मण वेताळ, तानाजी वेताळ, रावसाहेब गणपती वेताळ, मोहन वेताळ, राजेंद्र वेताळ, विष्णू वेताळ, कृष्णा वेताळ, लक्ष्मण कुंडलिक वेताळ, महादेव खरपुडे यांच्याविरूध्द परंडा पोलिस ठाण्यात भादंंवि कलम ३२६, ३२४, ३२३, १४७, १४८, १४९, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तसेच सुखदेव चांगदेव वेताळ यांनीही फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, सोनगिरी (ता.परंडा) येथील गायरानात सकाळी ७ च्या सुमारास रामेश्वर पाटील, दत्तात्रय वेताळ गायरानमधून शेतात जात होते़ त्यावेळी चतरंग्या वांग्या पवार, मण्याबाई पवार, उषा पवार, चिवलाबाई काळे, गुडी गणेश पवार, रुपाली पवार, सुषमा काळे, (सर्व काशीमबाग, परंडा) व इतरांनी कोयता, काठ्या घेऊन ‘तुम्ही गायरानात का आलात’ असे म्हणून शिवीगाळ करुन डोळ्यात चटणी टाकून कोयत्याने, काठीने मारहाण करून गंभीर जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिली. वेताळ यांच्या फिर्यादीवरुन चतरंग्या वांग्या पवार, मण्याबाई पवार, उषा पवार, चिवलाबाई काळे, गुडी गणेश पवार, रुपाली पवार, सुषमा काळे यांच्याविरूध्द परंडा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२६, ३२४, ३२३, १४८, १४९, ५०४, ५०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पारवे पाटील हे करीत आहेत. या हाणामारीत सातजण गंभीर जखमी झाले असून, काहींना सोलापूर, उस्मानाबाद येथे तर काहींना परंडा येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ पोलिसांनी रात्री उशिरा यातील दोघांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले़ (वार्ताहर)अतिक्रमणधारकांचे आंदोलनपारधी समाजातील लोकांनी आपली मुले, जनावरांसह तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दि २२ मे रोजी ठिय्या आंदोलन करत रस्ता रोखून धरला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन हे आंदोलन हाणून पाडले होते़ यानंतर पारधी समाजातील महिलांनी प्रभारी तहसीलदार एस एस पांडळे यांच्या दालनात प्रवेश करुन घेराव घातला. गायरान जमीन कसण्यासाठी देण्याची मागणी करत जमीन न दिल्यास २ जून पासून बेमुदत उपोषण क रण्याचा इशारा दिला होता़ त्यानुसार पारधी समाजातील नागरिकांनी २ व ३ जून असे दोन दिवस उपोषण केले होते़सहा महिन्यापासून वादपारधी समाजातील लोकांनी सोनगिरी येथील गायरान जमीनीवर सहा महिन्यापूर्वी अतिक्रमण केले होते़ त्यावेळी ग्रामस्थांनी गायरानवरील अतिक्रमण हटविण्याबाबत परंडा तहसीलसमोर उपोषण केले़ तेव्हा प्रशासनाने संयुक्त कारवाई करून अतिक्रमण हटवले होते़कारवाईनतंर दोनच महिन्यांनी परत गायरान जमिनीवर पारधी समाजातील नागरिकांनी कब्जा करून घरे उभारली़ याविरोधात ग्रामस्थांनी पुन्हा एकत्रित येत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता़ मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़ पुन्हा कारवाईलोकसभेची आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर ग्रामस्थांनी अतिक्रमणाविरोधात यल्गार पुकारला होता़ त्यामुळे प्रशासनाने २२ मे रोजी अतिक्रमण हटविले होते़ अतिक्रमण हटविल्यानंतर ग्रामस्थांनी जमिनीची साफसफाई करून वृक्षारोपण केले होते़