शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहर पाणीपुरवठा योजनेचा ‘डीपीआर’ १५०० कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:32 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजना गुंडाळल्यानंतर सातारा-देवळाई, वाळूज परिसर आणि औरंगाबाद शहरासाठी सर्व मिळून १५०० कोटी रुपयांचा नवीन सुधारित ...

ठळक मुद्देसमांतर गुंडाळल्यानंतर नव्याने प्रस्ताव : मुख्यमंत्र्यांकडे लवकरच होणार बैठक

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजना गुंडाळल्यानंतर सातारा-देवळाई, वाळूज परिसर आणि औरंगाबाद शहरासाठी सर्व मिळून १५०० कोटी रुपयांचा नवीन सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महापालिकेने तयार केला आहे. या डीपीआरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असून, त्यानंतर योजना राबविण्याचा निर्णय होणार आहे.शहरालगतचा परिसर आणि वाळूज-बजानगर भागात जलवाहिन्या, जलकुंभ उभारण्याचा नवीन डीपीआरमध्ये समावेश आहे. समांतर योजनेची कंत्राटदार कंपनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीसोबत न्यायालयाबाहेर तडजोड करणे मनपाला शक्य झाले नाही. त्यामुळे नवीन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. त्यात शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १०२३ कोटी आणि सातारा-देवळाईसाठी ४०० कोटींचा प्रस्ताव मनपाने शासनाकडे पाठविला; परंतु शासनाने दोन्ही प्रस्ताव एकत्रितरीत्या पाठविण्याची सूचना केल्यानंतर पालिका प्रशासनाने नव्याने एकत्रित प्रस्ताव तयार केला. डीपीआरच्या अनुषंगाने महापौर दालनात बैठक झाल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले, शासनाच्या सूचनेनुसार सातारा-देवळाईसह शहराचा सुधारित डीपीआर पीएमसीने तयार केला आला आहे. त्यामध्ये ज्या वसाहतीत अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत, अशा नो नेटवर्क एरियासह वाळूज-बजाजनगर परिसराचा समावेश आहे. प्रशासनाने डीपीआरच्या सादरीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे नवीन योजनेचे सादरीकरण केले जाणार आहे.२००५-०६ मध्ये समांतर जलवाहिनी योजनेची चर्चा सुरू झाली. २०१०-११ मध्ये ७९२ कोटींच्या योजनेसाठी कन्सेशन अ‍ॅग्रीमेंट झाले. करारातील जाचक अटींमुळे योजना वादात अडकली. जून २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी सभेच्या मान्यतेने पीपीपी करार रद्द करीत कंत्राटदार कंपनीचे काम थांबविले. यानंतर कंपनीने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.१० वर्षे झाले एक योजना पूर्ण होईना२००९ ते २०१९ समांतर जलवाहिनी योजनेचा प्रवास पाहता पाणीपुरवठ्याची महत्त्वाची योजना महापालिकेला पूर्ण करता आली नाही. सहा मनपा आयुक्त या काळात बदलून गेले; परंतु एकाच्याही कार्यकाळात योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न झाले नाहीत. राजकीय नेत्यांच्या स्वार्थापोटी योजनेचे पाणी-पाणी झाले, त्यात प्रशासनही भरकटत गेले. परिणामी, ८०० कोटींची योजना १५०० कोटींपर्यंत गेली आहे. ७०० कोटी रुपयांनी योजना महागली आहे. लोकसभा निवडणुकीत शहरातील विस्काळीत पाणीपुरवठा आणि योजनेवरून शिवसेनेची प्रचंड नाकाबंदी झाली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका