उस्मानाबाद : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..’ ‘जय भवानी, जय शिवाजी़़’ या गगणभेदी घोषणांनी गुरूवारी शहरातून दुचाकीवर रॅली काढण्यात आली़ कोल्हापुरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या रॅलीने उस्मानाबाद शहर दणाणून गेले होते़छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त मागील आठ दिवसांपासून शहरात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत़ शिवराज्याभिषेक सोहळा समिती व मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले़ या अनुषंगाने शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने गुरूवारी युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत दुचाकी रॅली काढण्यात आली़ तत्पूर्वी शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध मान्यवरांनी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़ तर रॅलीत सहभागी होण्यासाठी शहरासह परिसरातील अनेक युवक शिवाजी चौकात दाखल झाले होते़ रॅलीच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ शिवाजी चौकातून निघालेली ही रॅली देशपांडे स्थानक, नेहरू चौक, काळा मारूती चौक, आर्य समाज, जिजाऊ चौक मार्गे बसवेश्वर चौक व परत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली़ येथे रॅलीचा समारोप करण्यात आला़ रॅली यशस्वी करण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा समिती पदाधिकाऱ्यांसह युवकांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)
शिवरॅलीने शहर दणाणले
By admin | Updated: February 20, 2015 00:07 IST