शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

शहर पोलीस, एमएसडीसीएल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:46 IST

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या राम कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस आणि एमएसडीसीएल संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.

ठळक मुद्देऔद्योगिक स्पर्धा : अजय, अमोल यांची झंझावाती शतके

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या राम कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस आणि एमएसडीसीएल संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अजय कावळे आणि अमोल खरात यांनी एकाच सामन्यात झळकावलेली दणदणीत शतके ही सोमवारी झालेल्या सामन्यातील वैशिष्ट्य ठरले.सकाळच्या सत्रात अजय कावळे याने झंझावाती फलंदाजी करताना अवघ्या ५२ चेंडूंतच १० टोलेजंग षटकार व ५ खणखणीत चौकारांसह ११० धावांची दणकेबाज खेळी केली. त्याला शेख अलीम याने ५० चेंडूंत ५ षटकार व ८ चौकारांसह ८७ धावा करीत साथ दिली. या दोघांच्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर शहर पोलीस ब संघाने २० षटकांत ३ बाद २२३ धावांचा एव्हरेस्ट रचला. आयआयए संघाकडून मिर्झा मसूद याने २, तर अमोल खरात याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात अमोल खरात याने ६१ चेंडूंतच ५ षटकार व ८ चौकारांसह नाबाद १०२ धावांची झुंजार खेळी केल्यानंतरही आयआयए संघ ४ बाद १६१ पर्यंत मजल मारू शकला. रझा कुरैशीने १५ धावा केल्या. शहर पोलिसकडून राजू प्रचाके याने २ व शेख अकबरने १ गडी बाद केला.दुसºया सामन्यात एमएसडीसीएलविरुद्ध आयुर्विमा संघाने ९ बाद ७६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून संजय जाधवने ४४ चेंडूंत २ षटकार व २ चौकारांसह सर्वाधिक ३७ धावा केल्या. एमएसडीसीएलकडून बाळासाहेब मगर याने २१ धावांत ३ व सय्यद इनायत याने ७ धावांत २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमएसडीसीएल संघाने ६.५ षटकांतच ३ गडी गमावून ७६ धावा करीत विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून सुशील गणोरकर याने ३१ धावांत २ गडी बाद केले.