शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शहराला १३ अग्निशमन केंद्रांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:52 IST

शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून आजपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागांत आग लागते. कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी रात्रं-दिवस अग्निशमन विभागाला धावपळ करावी लागत आहे. पन्नास हजार लोकसंख्येसाठी किमान १ अग्निशमन केंद्र असावे, असे निकष आहेत. शहरात आज तब्बल १३ अग्निशमन केंद्रांची गरज असताना अवघ्या तीन केंद्रांवर काम सुरू आहे. नवीन पाच अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी दहा वर्षांपूर्वी मनपाला शासन निधी मिळाला.

ठळक मुद्देउपलब्ध फक्त तीन : दहा वर्षांपासून पाच नवीन केंद्र बांधण्याचा प्रस्ताव

औरंगाबाद : शहरात कचराकोंडी सुरू झाल्यापासून आजपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागांत आग लागते. कचऱ्याला लागलेली आग विझविण्यासाठी रात्रं-दिवस अग्निशमन विभागाला धावपळ करावी लागत आहे. पन्नास हजार लोकसंख्येसाठी किमान १ अग्निशमन केंद्र असावे, असे निकष आहेत. शहरात आज तब्बल १३ अग्निशमन केंद्रांची गरज असताना अवघ्या तीन केंद्रांवर काम सुरू आहे. नवीन पाच अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी दहा वर्षांपूर्वी मनपाला शासन निधी मिळाला. आजपर्यंत महापालिकेने एकही केंद्र उभारले नाही.शहर चारही दिशेने झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी २५ ते ३० हजार नागरिकांची या शहरात भर पडत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच नागरिकांना दर्जेदार सेवा-सुविधा देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. बांधकाम नियमावलीत शासन दरवर्षी आमूलाग्र बदल करीत आहे. जमिनीचा जास्तीत जास्त वापर व्हावा म्हणून उंच इमारती बांधण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. शहरात पूर्वी पाच मजली इमारतींचा ट्रेंड होता. मागील काही वर्षांमध्ये दहा मजलीपर्यंतही बांधकामे सुरू झाली आहेत. या उंच इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी महापालिकेकडे अत्याधुनिक यंत्रणाच नाही. औरंगपुºयातील फटाका मार्केटला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाला पोहोचण्यास उशीर झाला होता. त्यामुळे तत्कालीन अग्निशमन अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. प्रत्येक पाच किलोमीटरच्या परिघात किमान एक तरी अग्निशमन केंद्र असावे, असा निकष आहे. महापालिका सध्या पदमपुरा, सिडको आणि एमआयडीसी चिकलठाणा येथे तीन अग्निशमन केंद्रे चालवीत आहे. शहरात केंद्रांची संख्या वाढवावी म्हणून शासनानेही ५ कोटींचा निधीही दिला होता. या निधीचा बट्ट्याबोळ केल्यानंतर आता दोन कोटीच शिल्लक आहेत. एवढ्या तुटपुंज्या निधीत नवीन पाच केंद्रे बांधणे अशक्यप्राय आहे. जुना निधी खर्च झालेला नसताना शासनाकडे आणखी निधीची मागणी कशी करणार? शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास तब्बल १३ केंद्रे असायला हवीत. नवीन अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचा जावईशोधही महापालिका प्रशासनाने लावला होता. अग्निशमन विभागासाठी नवीन पाच फायर टेंडर खरेदी करण्याचा मुद्याही मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहे.--------------

टॅग्स :fireआगAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका