शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकास आराखड्याचे झाले त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:34 IST

शहर विकास आराखड्याचे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्णत: त्रांगडे करून टाकले आहे. परिणामी अनियोजित आणि बकालतेकडे शहराची वाटचाल सुरू असून, अनधिकृत बांधकामे, प्लॉटिंगचा सपाटा सर्वत्र सुरू आहे. धोरणात्मक निर्णय, अर्थकारण आणि बेकायदेशीररीत्या आराखड्यात लुडबूड करून काही दलालांनी शहराच्या नियोजनाची दिशा बदलून दशा केली आहे.

ठळक मुद्देसर्वाेच्च न्यायालयात आज तारीख: अनियोजित आणि बकालतेकडे वाटचाल

औरंगाबाद : शहर विकास आराखड्याचे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्णत: त्रांगडे करून टाकले आहे. परिणामी अनियोजित आणि बकालतेकडे शहराची वाटचाल सुरू असून, अनधिकृत बांधकामे, प्लॉटिंगचा सपाटा सर्वत्र सुरू आहे. धोरणात्मक निर्णय, अर्थकारण आणि बेकायदेशीररीत्या आराखड्यात लुडबूड करून काही दलालांनी शहराच्या नियोजनाची दिशा बदलून दशा केली आहे.विकास आराखड्याप्रकरणी झालेल्या न्यायालयीन प्रकरणावर हायकोर्टाने महापालिकेवर ताशेरे ओढल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात आराखड्याचे प्रकरण असून, त्यावर १२ जुलै रोजी तारीख आहे. त्यासाठी महापौरांसह पालिकेचे अधिकारी गुरुवारी दिल्लीला रवाना झाले.१९७५ नंतर १९९१ साली विकास आराखडा तयार झाला. त्यानंतर २००१ साली सुधारित आराखड्याचे काम झाले. त्यानंतर नियमित आराखड्याचे काम सुरू झाल्यानंतर २०१५ साली पाच सदस्यीय समिती आराखड्यासाठी गठीत करण्यात आली. समितीने आरक्षणाबाबत सुनावणी घेऊन अहवाल दिला. दरम्यान, सर्वसाधारण सभेने आराखड्यातील बदलांना मंजुरी दिल्यामुळे प्रकरण हायकोर्टात गेले. हायकोर्टाने आराखड्याप्रकरणी पालिकेला फटकारले. धोरणात्मकरीत्या आराखड्यात केलेले बदल पचविण्यासाठी मनपातील महाभागांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. २०१६-१७ पासून विकास आराखड्याबाबत काहीही निर्णय होत नसल्यामुळे १८ खेडी, नवीन रस्ते, क्रीडांगणे, समाजोपयोगी जमिनींचे आजवर काय झाले असेल त्याकडे मनपाने ढुंकूनही पाहिलेले नाही.चार आयुक्त बदलून गेलेविकास आराखडा प्रकरण जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून प्रकाश महाजन, सुनील केंद्रेकर,ओमप्रकाश बकोरिया, डी.एम.मुगळीकर हे चार आयुक्त बदलून गेले आहेत. विद्यमान आयुक्त डॉ.निपुण विनायक यांच्या कार्यकाळात आराखड्याचे प्रकरण एक इंचही पुढे सरकले नाही. याच काळात तीन महापौर, पाच सभापती झाले.शहराचे वाटोळे होत आहेमाजी नगरसेवक समीर राजूरकर म्हणाले, शहराची लोकसंख्या वाढते आहे. ग्रीन झोन रहिवासी होत चालला आहे. हायकोर्टाच्या आदेशाने सुधारित आराखडा करणे गरजेचे होते. आराखड्याचा नकाशा प्रकाशित केल्यानंतर स्थायी समितीकडे आक्षेपासाठी जातो. तो नकाशा थेट सभागृहात आणणे हे चुकीचे होते. तीन वर्षांपासून विकास आराखडा रखडल्यामुळे शहराचे वाटोळे होत आहे. १८ खेड्यांत अनधिकृत बांधकामे आणि प्लॉटिंग वाढत आहे. आरोग्य केंद्र, खेळाची मैदाने गायब होत चालली आहेत, असे झाले तर भविष्यात या शहरातील मुलांना खेळण्यासाठी प्रांगण शिल्लक राहणार नाही.हिरव्याचे पिवळे करण्यात आर्थिक घोळ?नगररचना विभागाने आराखड्यात टाकलेल्या आरक्षणात विद्यमान जागांचा वापर कशासाठी होत आहे, हे न तपासताच आरक्षणे टाकली होती. ही बाब हेरून काही दलालांनी आराखड्यातील ग्रीन झोनचे (कृषी आरक्षित) आरक्षण उठवून तेथे यलो झोनचे (निवासी आरक्षित) आरक्षण केले. नगररचना विभागाच्या सगळ्या नकाशांची वाट लावून आराखड्याची अर्थकारणासाठी दिशा बदलली. यामध्ये मोठे आर्थिक घोळ झाल्याचे आरोप अजूनही सुरू आहेत. आराखड्यातील आरक्षण हटविण्यासाठी आर्थिक व्यवहार झाले असतील, तर देणारे अजून गप्प का? आहेत. असा प्रश्न आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcity chowkसिटी चौक