शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शहर बससेवाही सुरू झाली; पहिल्या टप्प्यात प्रमुख पाच मार्गांवर १६ बसेस धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 15:31 IST

फेब्रुवारी, २०२१च्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यामुळे १० मार्चनंतर सिटी बस व्यवस्थापनाने पुन्हा एकदा बससेवा बंद केली.

ठळक मुद्देप्रवाशांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून, बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद करण्यात आलेली स्मार्ट सिटीची शहर बससेवा मंगळवारपासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती सोमवारी महापालिका प्रशासनाने दिली. प्रमुख पाच मार्गांवर १६ बसेसच्या माध्यमातून २४२ फेऱ्या केल्या जाणार आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारपासून शहर बस सुरू करण्याचे आदेश दिले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ५ नोव्हेंबर, २०२० रोजी पहिल्या टप्प्यात ३० बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी, २०२१च्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यामुळे १० मार्चनंतर सिटी बस व्यवस्थापनाने पुन्हा एकदा बससेवा बंद केली. आता ८७ दिवसांनी अनलॉक जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मंगळवारपासून प्रमुख पाच मार्गांवर १६ बसेस सुरू केल्या जाणार आहेत. प्रवाशांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून, बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन स्मार्ट शहर बस विभागाने केले आहे. सर्व बसेस निर्जंतुक केलेल्या राहतील, तर प्रवासाच्या वेळी मास्क, सॅनिटायझर वापरणे व शासकीय आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून दुसऱ्या टप्प्यातील बसेस सुरू केल्या जातील, असे प्रशासनाने म्हटले आहे.

या पाच मार्गांवर धावणार शहर बस- मार्ग क्र. ४ : सिडको ते रेल्वे स्टेशनमार्गे टीव्ही सेंटर- मार्ग क्र. ५ : औरंगपुरा ते रांजणगावमार्गे मध्यवर्ती बस स्थानक- मार्ग क्र. १० : औरंगपुरा ते छत्रपती शिवाजी नगरमार्गे महावीर चौक, सेव्हन हिल- मार्ग क्र. १२ : सिडको ते घाणेगावमार्गे रांजणगाव, मायलन- मार्ग क्र. १३ : सिडको ते जोगेश्‍वरीमार्गे रांजणगाव.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका