शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शहरात दुसऱ्या दिवशीही गुन्हे शाखेकडून शस्त्रे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 18:11 IST

खेळणीच्या नावाखाली घातक शस्त्रे मागविण्यात येत असल्याचे सोमवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आले. शहरातील विविध भागांत पोलिसांनी कारवाई करून शस्त्रसाठा जप्त केला.

ठळक मुद्दे शहरातील इन्स्टाकार्ट सर्व्हिसच्या कार्यालयावर पाळत ठेवून गुन्हे शाखेने हा शस्त्रसाठा जप्त केला

औरंगाबाद : खेळणीच्या नावाखाली घातक शस्त्रे मागविण्यात येत असल्याचे सोमवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आले. शहरातील विविध भागांत पोलिसांनी कारवाई करून शस्त्रसाठा जप्त केला. या घटनेला १४ तास उलटत नाहीत तोच दुसऱ्या दिवशीही शस्त्रसाठा आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. शहरातील इन्स्टाकार्ट सर्व्हिसच्या कार्यालयावर पाळत ठेवून गुन्हे शाखेने हा शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

जयभवानीनगर, नागेश्वरवाडीत मंगळवारी शस्त्रास्त्र साठाप्रकरणी डिलिव्हरी हब, आॅफिसचे इंचार्ज, तसेच शस्त्रे मागविणाऱ्यांना अटक करून मुकुंदवाडी व क्रांतीचौक पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. मंगळवारच्या पोलीस कारवाईनंतरही नागेश्वरवाडीतील इन्स्टाकार्टच्या कार्यालयात कुरिअरने शस्त्रास्त्रे दाखल झाली. याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहकारी कुरिअरच्या कार्यालयात धडकले. पार्सलची तपासणी केली असता पुन्हा धारदार शस्त्रे आढळून आली.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, फौजदार नंदकुमार भंडारी, साईनाथ महाडिक, पोहेकॉ सुभाष शेवाळे, संजय धुमाळ, पोलीस नाईक सतीश हंबरडे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, अफसर शहा, पोकॉ सय्यद अशरफ, सिद्धार्थ थोरात, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, ओमप्रकाश बनकर, राहुल हिवराळे, नितीन धुळे, राजेंद्र चौधरी, मच्छिंद्र सोनवणे, रत्नाकर म्हस्के, कांबळे, शिवा बोर्डे यांनी कार्यालयाचा ताबा घेत पार्सलची तपासणी केली. त्यावेळी ५ तलवारी, १ जंबिया, १ दोनपाती धारदार चाकू, अशी ७ शस्त्रास्त्रे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शस्त्रसाठा कशासाठीशहरात नुकतीच दंगल झाली असून, त्या पार्श्वभूमीवर शस्त्रसाठा पकडणे म्हणजे ही धोक्याची घंटा समजली जात आहे. कुरिअरच्या माध्यमातून खेळणीच्या नावाखाली शस्त्रे राजरोसपणे शहरात येत आहेत. ती कशासाठी वापरली जाणार होती, याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दोन पथके रवानाभिवंडी येथून शस्त्राचा साठा कुरिअरमार्फत शहरात ज्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांच्या घरी येत होता. खुलेआम प्राणघातक शस्त्र खेळणीच्या नावाखाली शहरात पाठविणाऱ्या बंगळुरु व  भिवंडी येथील संचालकांच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आल्याचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले.

पार्सलवर नावे अपूर्णपोलिसांना जे पार्सल आढळून आले त्यावर सिंगल नावे आहेत, त्यामुळे पोलीस पत्ता शोधण्यासाठी कुरिअरच्या पावतीवर टाकलेला मोबाईल नंबर व स्थानिक पत्यावरून आरोपीचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेची सात पथके  विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. - डॉ.दीपाली धाटे-घाडगे

शहरातील कुरिअर सेवेची तपासणीशहरात किती आॅनलाईन डिलिव्हरीची कार्यालये आहेत. त्यांनी आतापर्यंत पोहोच केलेली घातक शस्त्रे कोणकोणत्या भागात पाठविली आहेत, त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. कुरिअर चालकांचे आवक-जावक रेकॉर्ड तपासल्याशिवाय शस्त्रसाठा किती ठिकाणी पोहोचला, हे सध्या सांगणे योग्य नाही. आम्ही चौकशी करीत आहोत.- चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त, औरंगाबाद

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद