शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 17, 2022 16:04 IST

डिजिटल बँकिंगने करून दाखविले, यूपीआयमुळे एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : तुम्ही स्वत:लाच विचारा की, आपण मागील किती महिन्यांपासून एटीएममध्ये जाऊन रोख रक्कम काढली? काही जण म्हणतील महिनाभरापूर्वी, काही म्हणतील सहा महिने, तर काही जण सांगतील वर्षभरापासून मी एटीएममध्ये गेलोच नाही. पूर्वी पैसे काढण्यासाठी बँकेत किंवा एटीएमवर जावे लागत असे. मात्र, आता बँकच प्रत्येकाच्या खिशात सामावली आहे. मागील वर्षभरात शहरात डिजिटल व्यवहार ५० टक्क्यांनी वाढले. याचा परिणाम, आधीच बँकेच्या कॅश काऊंटरवर झाला होता, आता एटीएमवरही होणे सुरू झाले आहे. ३० टक्क्यांनी एटीएमवरील व्यवहार कमी झाल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले आहे.

एटीएमच्या गर्दीवर परिणाममहाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने सांगितले की, यूपीआयमुळे त्यांच्या एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. पूर्वी एटीएमवर गर्दी दिसत होती, आता ती दिसत नाही. दिवाळीतही कोणत्याच एटीएमवर रोख काढण्यासाठी मोठ्या रांगा दिसल्या नाही.

पगार खिशात नव्हे मोबाइलमध्येचवर्षभरापूर्वी कर्मचारी पगार झाल्यावर ते एटीएममधून काढून घरी आणत. मात्र, आता अनेक जण महिनोन महिने एटीएममध्ये जातच नाहीत. चिल्लर व्यवहारही यूपीआयद्वारे केले जात आहे. यामुळे पगार आता मोबाइलमध्येच राहत आहे.

एटीएम कार्ड विसरण्याचे प्रमाण वाढलेबँक व्यवस्थापकाने सांगितले, एटीएममध्येच कार्ड विसरून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. एका एटीएमवर मागील वर्षभरात ४३ एटीएम कार्ड सापडले. ते घेण्यासाठी लोक पुन्हा येत नाही. ते बँकेत फोन करतात व कार्ड ब्लॉक करून टाकतात. नवीन एटीएम कार्ड घेतात.

सर्वाधिक एटीएम एसबीआयचेचजिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ३१७ एटीएम आहेत. त्यापैकी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे २२७ एटीएम आहेत. १६ खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक १२५ एटीएम आहेत.

व्यवहारात वाढला ‘यूपीआय’ वापरदेशात सध्या दररोज ११ लाख कोटींचे व्यवहार यूपीआयमार्फत होत आहेत. त्यासाठी ६७८ कोटी ट्रान्झॅक्शन केले जात आहे. मे महिन्यातील आकडेवारी १० लाख कोटी होती.

कॅश काऊंटरवर ५० टक्के परिणामएटीएम आल्यापासून बँकेतील कॅश काऊंटरवर २० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला होता. आता यूपीआयमुळे कॅश काऊंटरवरील रोख रकमेचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.- हेमंत जामखेडकर, महासचिव, सीबीआयइए

अजून नाही परिणामएसबीआयच्या टाऊन सेंटर येथील एटीएमवर अजून युपीआयचा तेवढा परिणाम झाला नाही. आम्हाला दिवसातून दोन वेळेस एटीएममध्ये रक्कम भरावी लागते.- इम्तियाज परवेज, मुख्य व्यवस्थापक, एसबीआय टाऊन सेंटर शाखा

डिजिटल व्यवहाराकडे वाढता कलडिजिटल व्यवहाराकडे नागरिकांचा कल वाढत आहे. कोणी जवळ पैसा बाळगण्यास तयार नाही. पैशाची जागा मोबाइलने घेतली आहे. त्याद्वारे खिशातच बँक घेऊन नागरिक फिरत आहे. डिजिटल क्रांती घडत आहे.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

पेट्रोल पंपावर ५० टक्के व्यवहार डिजिटलमागील दोन वर्षात यूपीआयमुळे रोख व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. आमच्या पेट्रोल पंपावर दररोज होणारे व्यवहारापैकी ५० टक्के व्यवहार डिजिटल होत आहे. तर उर्वरित ५० टक्के व्यवहार रोख स्वरूपात होत आहे.- अखिल अब्बास, पेट्रोल पंप मालक

जिल्ह्यात ५६६ एटीएमबँक             --- एटीएमपब्लिक सेक्टर बँक -- ३१७प्रायव्हेट बँक---२३९स्मॉल फायनान्स बँक--०७महाराष्ट्र ग्रामीण बँक --- ०१जिल्हा मध्यवर्ती बँक-- ०२(जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त आकडेवारी)

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादatmएटीएमbankबँक