शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यांनी नागरिक त्रस्त; १०० कोटींच्या रस्त्यांचे निव्वळ आश्वासने

By मुजीब देवणीकर | Updated: April 15, 2023 19:57 IST

स्मार्ट सिटी मार्फत ३१८ कोटी रुपये खर्च करून १०९ रस्ते करण्यात येणार, मनपा फंडातून १०० कोटी रुपये खर्च करून ६१ रस्ते तयार केले जाणार, अशा घोषणा दोन वर्षांपासून करण्यात येत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी मनपाकडून झोननिहाय मोहीम राबविण्यात येते. एप्रिल महिना सुरू झाला तरी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना संसर्गापासून मनपाने पॅचवर्कच काम केलेले नाही.

स्मार्ट सिटी मार्फत ३१८ कोटी रुपये खर्च करून १०९ रस्ते करण्यात येणार, मनपा फंडातून १०० कोटी रुपये खर्च करून ६१ रस्ते तयार केले जाणार, अशा घोषणा दोन वर्षांपासून करण्यात येत आहेत. प्रत्यक्षात स्मार्ट सिटीच्या रस्त्यांची योजना अत्यंत फसवी असल्याचे निदर्शनास येत आहे. दीड वर्षात ३० रस्तेही तयार झाले नाहीत. उर्वरित रस्ते होण्याची शक्यताही कमीच आहे. निधी, दरवाढ इत्यादी मुद्द्यांवर ही कामे रखडली आहेत. त्याचप्रमाणे १०० कोटी रुपये खर्च करून मनपा रस्ते करणार असे सांगितले. निविदाही काढली. अजून वर्कऑर्डर नाही. भविष्यात रस्त्याची ही कामे होणार म्हणून मनपा साधे पॅचवर्क ही करायला तयार नाही. मागील दोन वर्षांमध्ये तर निव्वळ मुरूम माती टाकून खड्डे बुजविण्यात आले. सध्या ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाजारात खरेदीसाठी अलोट गर्दी झाली आहे. पादचारी, वाहनधारकांना जुन्या शहरातील खड्ड्यांचा बराच त्रास सहन करावा लागतोय.

दीड महिना शिल्लकपावसाळ्यात डांबरी पॅचवर्कची कामे करता येत नाहीत. मनपाकडे सध्या दीड महिनाच शिल्लक आहे. मे अखेरपर्यंत ही कामे करावी लागणार आहेत.

पॅचवर्कचे नियोजन सुरूमागील वर्षी झोननिहाय पॅचवर्कसाठी आर्थिक नियोजन केले होते. कंत्राटदारांनी निविदा प्रक्रियेला अजिबात प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काम झाले नाही. सध्या तीन झोनसाठी कंत्राटदार उत्सुक आहेत. लवकरच पॅचवर्कची कामे होतील. - ए. बी. देशमुख, शहर अभियंता

कोणते रस्ते सर्वाधिक खराब ?मनपा मुख्यालय ते रोशन गेटपैठण गेट ते गुलमंडीशहा बाजार ते चंपा चौकशहागंज ते जुना बाजारमहात्मा फुले पुतळा ते नेहरू भवनहर्षनगर ते मंजूरपुरा सिटी चौक ते नौबत दरवाजा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका