शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या बॅंकेच्या रिकव्हरी एजंटला नागरिकांनी दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 17:59 IST

crime news in Aurangabad रिकव्हरी एजंट पीडितेच्या घरी कर्जाचे हप्ता नेण्यासाठी जात असतो.

ठळक मुद्दे पीडितेचे आई, बाबा घरी नव्हते. ही संधी साधून त्याने अचानक तिला प्रेमपत्र दिले.हात पकडला आणि तिला तो ‘आय लव्ह यू’ म्हणाला.

औरंगाबाद : नामांकित बॅंकेच्या कर्जवसुली एजंटाने १३ वर्षीय मुलीला ‘आय लव्ह यू’ची चिठ्ठी देऊन तिचा विनयभंग केला. यावेळी प्रसंगावधान राखून मुलीने आरडाओरड केल्यामुळे शेजारील लोकांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ही घटना गुरुवारी सकाळी मुकुंदवाडी परिसरात घडली.

अण्णा सांडू शेपूट (३०,रा. मयूरपार्क) असे आरोपीचे नाव आहे. तो एचडीएफसी बॅंकेचा वसुली एजंट आहे. तो नेहमी बॅंकेच्या थकबाकीदार कर्जदाराकडून हप्ते वसुलीचे काम करतो. पीडितेच्या घरी तो कर्जाचे हप्ता नेण्यासाठी जात असतो. तो १३ मे रोजी सकाळी १०:३० वाजता मुकुंदनगरात पीडितेच्या घरी गेला. यावेळी पीडितेचे आई, बाबा घरी नव्हते. ही संधी साधून त्याने अचानक तिला प्रेमपत्र दिले. त्याने तिचा हात पकडला आणि तिला तो ‘आय लव्ह यू’ म्हणाला. या प्रकाराने मुलगी घाबरून गेली आणि तिने आरडाओरड करून त्याच्या हाताला झटका देऊन हात सोडून घेतला. तिने शेजाऱ्यांना बोलविले. संधी मिळताच त्याने ती चिठ्ठी फाडून टाकली. शेजाऱ्यासह इतर लोक मदतीला धावले तेव्हा तो पळून जाण्याच्या तयारीत होता. लोकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना कळवून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर पीडितेच्या नातेवाइकांनी आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल केला. फौजदार सुनील चव्हाण यांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपी शेपूटला दोन दिवस कोठडी सुनावली.

आरोपी उच्च शिक्षितआरोपी अण्णा शेपूट याचे एम.ए., बी.एड.पर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षकाची नोकरी न मिळाल्याने बॅंकेत वसुली एजंट म्हणून काम करतो. चार महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले असल्याचे सूत्राने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद