शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला सिडको पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 18:46 IST

गस्तीवर असताना मिसारवाडी येथे दोन दुचाकीवरून तीन ते चार जण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली

औरंगाबाद : १० हजार रुपये प्रतिकिलो दराने गांजा विक्री करणाऱ्या तिघांना सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले. १९ किलो गांजासह एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

वीरेंद्रसिंग महेंद्रसिंग परदेशी (२२, रा. जयभवानीनगर), शुभम ऊर्फ बबलू गौतम मोरे (१९, रा. न्यू हनुमाननगर) आणि रामलाल ऊर्फ दीपक सरदार बारेला (१९, रा. बोराजंटा, ता. चोपडा, जि. जळगाव) अशी अटकेतील गांजा तस्करांची नावे आहेत. सिडको पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शोध पथक रविवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना मिसारवाडी येथे दोन दुचाकीवरून तीन ते चार जण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली.

पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, कर्मचारी सुभाष शेवाळे, नरसिंग पवार, दिनेश बन, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, रोहिदास खैरनार, लालखाँ पठाण, स्वप्नील रत्नपारखी, किशोर गाढे, विशाल सोनवणे, चालक योगेश म्हस्के यांनी दोन पंचांसमक्ष आरोपींना पकडण्यासाठी पिसादेवी ते  मिसारवाडी रस्त्यावर सापळा रचला. 

यावेळी दोन दुचाकीवरून गोण्या घेऊन तीन ते चार जण येत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना पाहून वाहने वळवून ते माघारी सुसाट जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. काही अंतरावर दुचाकीवरील गांजाची गोणी टाकून आरोपी वेगात निघून गेला तर अन्य दुचाकीवरील तीन जण आणि गांजाची गोणी पोलिसांच्या हाती लागली. पंचांसमक्ष आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळील गोण्याची तपासणी केली. गोण्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या गांजाचे वजन १९ किलो भरले. गांजासह आरोपींची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. आरोपींविरुद्ध सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक आहेर तपास करीत आहेत.

‘ते’ ठोक विक्रेतेपोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून हा गांजा आणल्याचे सांगितले. महाविद्यालयीन तरुण आणि गांजा ओढण्याचे व्यसन असलेल्या लोकांना किरकोळ दहा ते वीस ग्रॅमची पुडी विक्री करणाऱ्यांना ते ठोक दहा हजार रुपये प्रतिकिलो दराने गांजा विक्री करतात.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद