शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

झालर क्षेत्रातून सिडकोचे पॅकअप?

By admin | Updated: July 1, 2017 00:49 IST

औरंगाबाद : सिडकोने झालर क्षेत्रात काम करण्यास शासनाला स्पष्टपणे नकार दिला आहे.

विकास राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडकोने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शहरालगतच्या २८ गावांसाठी तयार केलेला विकास आराखडा कागदावरून अस्तित्वात आणण्यासाठी ‘नियोजन प्राधिकरण’ म्हणून कोणाकडे जबाबदारी द्यावी, यावरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याला कारणही तसेच आहे. सिडकोने झालर क्षेत्रात काम करण्यास शासनाला स्पष्टपणे नकार दिला आहे. परिणामी, २००८ ते २०१७ पर्यंत या ९ वर्षांत झालरमधील शेतकरी व नागरिकांची झालेली कुचंबणा यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यकर्त्यांनी यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर सुमारे १५ हजार हेक्टर जागा अनियोजितपणे विकसित होऊन भविष्यात बकाल स्वरूप धारण करील. झालर क्षेत्र विकास आराखडा मुख्यमंत्र्याच्या मंजुरीविना रखडला आहे. आराखडा मंजूर झाला तरी त्यानुसार नियोजन करण्यासाठी प्राधिकरण म्हणून कुणाला नेमायचे. याबाबत शासनाने अद्याप कुठलीही तयारी केलेली नाही. महापालिका किंवा औरंगाबाद रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी (एआरडीए), असे दोन पर्याय शासनासमोर आहेत. यातील एआरडीएचा मसुदा गेल्यावर्षी शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे एआरडीएच्या निर्मिताचा मार्ग मोकळा झाला असला तरी ते केव्हा स्थापन होणार, याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. या दोन्ही पर्यायांना पुरसे मनुष्यबळ, अनुदान आणि यंत्रणा उपलब्ध करून द्यावी लागेल. नुसता आराखडा मंजूर करून उपयोग नसून, त्यासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाची गरज असल्यामुळे सिडकोनंतर शासन कुणाकडे झालर क्षेत्र विकास आराखड्याचे काम देणार याकडे लक्ष लागून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एआरडीएकडेच झालर क्षेत्राची जबाबदारी दिली जाईल. सिडकोची भूमिका अशीसिडकोचे झालर क्षेत्राचे काम संपले आहे. शासनाकडे प्राधिकरण नेमण्यासाठी झालरचा आराखडा रखडला आहे. त्याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे, यावर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सिडकोला सर्क्युलर पाद्धतीने भूसंपादन करणे जमणार नाही. लियिनर पद्धतीने जमू शकेल. सिडको झालरमध्ये काम न करण्याची भूमिका ठेवून आहे. झालरमध्ये बांधकामे झाली आहेत, ती भूमिका शासनाने मान्य केली आहे. बैठकीत त्याबाबत शासनाला सांगितले आहे; परंतु अधिकृतरीत्या त्याबाबत घोषणा झालेली नाही. प्राधिरकरण म्हणून महापालिका किंवा विकास प्राधिकरणाकडे झालर क्षेत्र देण्याबाबत शासन विचार करील.