शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातील सिडको एन-३ मध्ये घरभाडे सर्वांत जास्त; पाणी नाही तिथे भाडे कमी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 8, 2023 19:55 IST

सर्वाधिक सुविधा ज्या भागात त्या भागास पसंती; तीन वर्षांत ५ टक्के वाढ

छत्रपती संभाजीनगर : शहरात नवीन घर खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, तसेच येथे भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. यामुळे अनेक जण घरात गुंतवणूक करून ते भाड्याने देत आहेत. त्यातून चांगले उत्पन्नही सुरू झाले आहे. ज्या भागात पाण्यापासून ते शाळा, कॉलेज, मॉलपर्यंत सर्व सुविधा जवळ आहेत अशा भागात सर्वाधिक भाडे द्यावे लागते, तर जिथे महानगरपालिकेचे पाइप व ड्रेनेजलाइन आली नाही तिथे घरभाडे थोडे कमी आहे.

कोरोनाकाळापासून अनेक जण स्वत:च्या घरात राहण्यासाठी गेले. यामुळे शहरात आजघडीला किरायाने दिले जात असलेली अनेक घरे रिकामी आहेत. याचा परिणाम भाडेवाढीवर झाला. जिथे वर्षाला १० टक्के भाडे वाढ होते तिथे मागील तीन वर्षांत ५ टक्क्यानेच भाड्यात वाढ झाली.

कोणत्या भागात काय घरभाडे ?परिसर             वन बीएचके, टू बीएचके, थ्री बीएचके बंगलासिडको एन ३-             २०-३५ हजार, ४०- ५० हजार, ५५-७० हजारज्योतीनगर परिसर १०-१५ हजार, २०- ३० हजार, ३०-३५ हजार, ६० ते ६५ हजारबीड बायपास ६- ७ हजार, ८ ते १० हजार, १५ ते २० हजार, २०-२५ हजारविमानतळ रोड - २० ते २५ हजार, ३०- ३५ हजार, ४० ते ४५ हजार(यातही विना फर्निचर व फर्निचरसहित फ्लॅटच्या भाड्यात ३ ते ४ हजारांची तफावत येते)(ही आकडेवारी इस्टेट एजंटने सांगितल्यानुसार आहे)

सर्वांत महाग सिडको एन-३सिडको एन-३ व एन ४ या परिसरात घराचे भाडे महाग आहे. कारण, हा परिसर हॉट प्रॉपर्टी म्हणून गणला जातोय. याशिवाय चिकलठाणा विमानतळ, ज्योतीनगर, गारखेडा सूतगिरणी ते शहानूरमिया दर्गा रोड या सर्व भागात भाडे जास्त आहे. कारण, येथे बाजारपेठ जवळ, शाळा, कॉलेज जवळ, हॉस्पिटल जवळ आहे. लोकेशन चांगले असल्याने येथे भाडेही जास्त आहे.

ज्या भागात पाणी नाही तिथे भाडे कमीज्या भागात महानगरपालिकेचे पाणी व ड्रेनेजलाइन नाही त्या भागात भाडे कमी आहे. उदाहरण बीड बायपास रोड होय, सातारा ते झाल्टा फाट्यापर्यंतच्या भागात थोडे भाडे कमी आहे.

५ टक्क्याने वाढले भाडेकोरोनाकाळाच्या आधी दरवर्षी ५ ते १० टक्क्याने घरभाडे वाढविले जात असे; पण कोरोनाकाळानंतर परिस्थिती बदलली व अनेक जण स्वत:च्या घरात राहण्यासाठी गेले. काही जण गावाकडे निघून गेले. यामुळे मोठ्या प्रमाणात घरे रिकामी राहिली. परिणामी, मागील तीन वर्षांत घरभाडे ५ टक्क्यांनीच वाढले.

घर भाड्याने घेताना घ्या काळजी१) घरापासून जवळच शाळा, नोकरीचे ठिकाण असावे.२) पाणी मुबलक आहे का व नळाचे की बोरचे हे पाहा.३) भाड्याचा करार १२ महिन्यांचा की लाँग टर्म हे पाहा.४) घरात लिकेज आहे का, विद्युत वायरी व्यवस्थित व डागडुगी करायची आहे का, ते पाहा.५) भाडे लाइट बिलासहित की, लाइट बिल स्वतंत्र ते बघा.६) घर भाड्याने घेतल्यास पहिले पोलिस स्टेशनला नोंद करा.

फर्निचर व बगर फर्निचर घर भाड्यात तफावतशहरात अनेकांनी फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली आहे व ते भाड्याने दिले जात आहे. हा मोठा व्यवसाय बनला आहे. फ्लॅट विनाफर्निचर व सेमी फर्निश्ड अथवा फूल फर्निश्ड भाड्यामध्ये फरक पडतो. एरियापेक्षा अनेक जण आपल्या बजेटमध्ये कुठे घर भाड्याने मिळते ते पाहतात.- अमर ठाकूर, इस्टेट एजंट

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजारHomeसुंदर गृहनियोजन