शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या तक्रारीनंतरही गुन्हे दाखल होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 18:51 IST

सिडको प्रशासनाने आठवडाभरापूर्वी ५ लोकांविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

वाळूज महानगर : सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात नियमबाह्यपणे भुखंडाच्या खरेदी-विक्री प्रकरणी सिडको प्रशासनाने आठवडाभरापूर्वी ५ लोकांविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

वाळूज येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या गट क्रमांक ३ मध्ये विकासकाने अनधिकृत रेखांकन केले आहे. या गटनंबरमध्ये नियोजित हनुमाननगरात अनधिकृत प्लॉटिंग पाडून विक्री केली जात आहे. याच प्रमाणे वाळूजला गट क्रमांक गट क्रमांक २२९ मध्ये अ‍ॅक्सा प्लॉटिंग सेंटर, गट नंबर २३७ मध्ये हाशिम पापा, गट क्रमांक २३८ मध्ये भारत लाँन्स व याच गट नंबर परमेश्वर वाघमारे यांनी साई सृष्टी पार्क आदी गट नंबरमध्ये संबंधिताने सिडको प्रशासनाची परवानगी न घेता भुखंडाची खरेदी-विक्री सुरु केली आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिडकोचे सहायक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे यांनी संबधित विकासकांविरुद्ध १२ डिसेंबरला वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या गटनंबरमधील अनधिकृत भुखंडाच्या खरेदी-विक्रीमुळे सर्व सामान्य नागरिकांची बिल्डराकडून फसवणूक होऊ नये, यासाठी संपूर्ण रेखाकंन निष्कासित करण्यात यावे, यासंबधी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

विशेष म्हणजे सिडको प्रशासनाच्यावतीने वडगाव कोल्हाटी व शरणापूर हद्दीत अनधिकृत भुखंड खरेदी-विक्री प्रकरणी जवळपास २०लोकांविरुध्द तक्रारी दिल्या आहेत. या तक्रारीवरुन संबधित बिल्डराविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. अनेक बिल्डर फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सिडकोचे सहायक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे म्हणाले, वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यासाठी अद्यापपर्यंत संपर्क साधला गेला नसल्याचे त्यांनी सांगितले. या विषयी पोलीस निरीक्षक सतीशकुमार टाक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

भुखंडाची खुलेआम विक्री सुरुचविशेष म्हणजे सिडको प्रशासनाने यापुर्वीही संबधित बिल्डरांना नोटीसा बजावल्या आहेत. या नोटिशींना लोकांनी केराची टोपली दाखवत भुखंडाची विक्री सुरुच ठेवली आहे. या लोकांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरुन गावठाण प्रमाणपत्राचे आधारे भूखंड विक्री करुन या भुखंडाच्या रजिस्ट्री करुन दिल्या जात आहेत.गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळसिडको प्रशासनाने वाळूज परिसरातील पाच गट नंबरपणे सुरु असलेल्या अनधिकृत भुखंड खरेदी-विक्री प्रकरणी संबधितांविरुध्द आठवडाभरापूर्वी तक्रार दिली आहे. मात्र, अद्यापर्यंत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झालेले नाहीत.

 

टॅग्स :cidco aurangabadसिडको औरंगाबादAurangabadऔरंगाबाद