शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर नामांतर झाले, पण कागदपत्रे अपडेट करण्याचा भुर्दंड सोसणार कोण?

By साहेबराव हिवराळे | Updated: March 14, 2023 19:00 IST

शासनाने मोफत अपडेट करावे : आधार, मतदानकार्ड, पासपोर्ट, वाहनचालक परवान्यासाठी वेळ व पैसा वाया जाण्याची भीती

- साहेबराव हिवराळेछत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्याने कागदपत्रावरील जिल्ह्याचे नाव बदलण्यासाठी जिल्हाभरातील जवळपास २९ लाख लोकांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सध्या नामांतरावर न्यायालयात हरकतीचा पाऊस पडत आहे; परंतु शासनाने आधारकार्डसह इतर कागदपत्रे मोफत अपडेट करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

आधारकार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, इतर विविध परवाने तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांवरील जिल्ह्याचे नाव बदलावे लागणार आहे. त्यासाठी खासगी सेंटरवर अधिकचे पैसे भरावे लागतात, तर सरकारी कार्यालयात उदा. पोस्ट कार्यालयात आधारकार्डच्या अपडेटला केवळ ५० रुपयांपर्यंत खर्च लागू शकतो; परंतु पासपोर्टसाठी अपडेट करायचे असल्यास १५०० रुपये खर्च तसेच काही कागदपत्रांना बाँडपेपरवर प्रतिज्ञापत्रदेखील दाखल करावे लागते. मग नागरिकांनी आपल्या कागदपत्रावर काय लिहावे, असा प्रश्न पडतो. आधारकार्ड व मतदान कार्ड तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात किंवा खासगी सेतू सेंटरवर अधिकचे पैसे भरण्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. केंद्र शासनाचे नोटिफिकेशन न आल्याने अजून केंद्राच्या अखत्यारित कार्यालयाचे नाव अद्याप बदलले नाही.

पासपोर्टसाठी पुन्हा ऑनलाईन पैसे भरावे काय?..नुकताच पासपोर्ट काढण्यात आला असून, तीन ते चार वेळा फेऱ्या माराव्या लागल्या. नावातील अल्फाबेटिकल एका शब्दातील चूक असल्यास संगणक ते ग्राह्य धरत नाही. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. आता जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले, मग पासपोर्टवर पूर्वीचेच नाव चालणार की बदलावे लागणार हे अद्याप स्पष्ट नाही. या प्रक्रिया शासनामार्फत मोफत कराव्यात अशी मागणी आहे. - सुभाष शेळके (शेतकरी)

मोफत योजना राबवावी...मतदान कार्ड तसेच आधारकार्ड शासनाने पूर्वी ज्या पद्धतीने मोफत केंद्र राबवून तयार करून दिले त्याच पद्धतीने आधार तसेच मतदान कार्ड द्यावे. खासगीचा खर्च गरिबांना पेलवणारा नाही.- श्रावण गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते)

आधारकार्ड दुरुस्तीला खर्च लागतो...कष्टकरी, मजुरांना मजुरीच अल्प मिळते. किमान गरिबांना तरी भुर्दंड बसू नये, याची काळजी सरकाने घ्यावी.- अशोक बोर्डे (सामाजिक कार्यकर्ते)

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAurangabadऔरंगाबादpassportपासपोर्ट