चितेगाव : चितेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने दोन दिवसात २६३ लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे, तर अजून ९५ जणांचे तपासणी अहवाल येण्याचे बाकी आहेत, असे तलाठी हसन सिद्दीकी यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांनी चितेगाव येथील सर्व व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले. या दोन दिवसात चितेगाव व जवळील गावांच्या दुकानदारांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल तलाठी हसन सिद्दीकी, ग्रामसेविका बी. व्ही. राठोड यांना प्राप्त झाला. त्यात २६३ व्यापाऱ्यांपैकी २३ जणांचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांना चितेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घराबाहेर पडणाऱ्यांनी मास्कचा नियमित वापर करावा. काही लक्षणं दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.
- शेख वाहेद याकुब, सरपंच, चितेगाव
फोटो :
चितेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात कोरोना तपासणी करताना दुकानदार वर्ग.